मुंबई : ठाणे- मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पथकर (टोल)चा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाचही नाक्यांवरून गोळा केलेली माहिती सहा महिन्यानंतरही जाहीर करण्यात मनसेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला बसताच ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे- मुंबईकरांना भेडसावणाऱ्या पथकराच्या समस्येचा सोयीस्करपणे विसर तर पडला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई तसेच ठाणे आणि परिसरातील वाहनधारकांना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पथकराच्या समस्येचा गेल्या काही वर्षांपासून सामना करावा लागत आहे. मुंबईतील उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ऐरोली, आनंदनगर, मुलुंड, दहिसर तसेच वाशी आदी ठिकाणी पथकर वसूल केला जातो. मात्र हा पथकर वसूल करणाऱ्या ठेकेदारमार्फत पथकर नाक्यावर मुलभूत सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. तसेच पथकर नाक्यावरील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या लागलेल्या रांगामुळे लोकांना बराच वेळ रांगेत थांबावे लागते. त्यातच ऑक्टोबरमध्ये या नाक्यावरील पथकरात वाढ करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही पथकरवाढ मागे घेण्यासाठी ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले होते.

Ambernath Vanchit Bahujan Aghadi, Ambernath,
वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा

हेही वाचा…राज ठाकरे केवळ जुन्या सहकाऱ्यांसाठीच सभा घेणार

पक्षाचे नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव पथकराच्या त्रासातून ठाणेकरांची सुटका करण्याची मागणी करीत उपोषणही केले होत. पथकराच्या प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेत पथकर नाके जाळून टाकण्याचा इशारा सरकारला इशारा दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार राजशिष्टाचार बाजूला ठेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी थेट ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक घेत या प्रश्नावर महिनाभरात तोडगा काढण्याची घोषणा केली होती. या बैठकीत १५ दिवसांसाठी सरकारसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई प्रवेशद्वारावरील पथकर नाक्यावर कॅमेरे बसवून दररोज किती गाड्यांची ये-जा होते यासह इतर माहिती गोळा करणे, या कॅमेऱ्यांसाठी मंत्रालयात कक्ष सुरु करणे, प्रत्येक नाक्यावर असलेल्या पिवळ्या पट्टीच्या पलीकडे गाड्यांची रांग गेल्यास सगळ्या गाड्या पथकर न घेता सोडल्या जातील.

चार मिनिटांच्या पलीकडे एकही गाडी टोलनाक्यावर थांबवणार नाही. ही सगळी यंत्रणा पोलिसांमार्फत राबवणे, पथकर नाक्यावर फास्टटॅग चालला नाही तर एकदाच पैसे घेणे, पथकर नाक्यावर सर्व सोयीसुविधा, स्वच्छ प्रसाधनगृहाची सोय करणे आणि सर्वेक्षण अहवालानुसार एक महिन्यात वाढीव पथकर आणि ठाणेकरांना पथकरातून दिलासा देण्याबाबचा निर्णय सरकार घेईल अशी घोषणा बैठकीनंतर ठाकरे आणि भुसे यांनी केली होती.

हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : माढा; मोहिते-पाटील आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

या सर्वेक्षणाचा अहवाल मनसेने तयार केला. पक्षाने घेतलेल्या आढाव्यानंतर या टोलनाक्यांवर पाच पट अधिक वाहने ये- जा करीत असून सरकार सांगत असलेला वाहनाचा आकडा चुकीचा असल्याचा दावा करीत याबाबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचे पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र गेल्या सहा महिन्यात पथकराबाबत मनसेच्या नेतृत्वाचे चकार शब्दही काढलेला नाही. तसेच पथकराबाबतची आकडेवारीही जाहीर करण्यात टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला बसताच मनसेने पथकराचा विषय सोडून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा…मराठवाड्यात मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल मुख्यमंत्र्याना देऊन मुंबई- ठाणेकरांना पथकरातून दिलासा मिळवून देण्याचा आणि त्याचा राजकीय लाभ घेण्याचा मनसेचा प्रयत्न होता. बदललेल्या राजकीय घडामोडीतून ठाकरे यांनाच सरकारच्या पंक्तीला बसावे लागले. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे मनसेनेला आता पथकर प्रश्नाचा विसर पडल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा…जम्मू-काश्मीरमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपाकडून नेत्याची हकालपट्टी?

पथकर नाक्यावरील वाहने आणि पथकर वसुली याबाबतची आकडेवारी मनसेने गोळा केली असून त्याचा अहवाल सरकारला देण्यात आला आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द सरकारकडून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय लांबला असला तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पश्न मनसे तडीस लावेल .– अविनाश जाधव, मनसे नेते