दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता जोसेफ विजयने राजकारणावर भाष्य केल्यानंतर तो सक्रिय राजकारणात सहभाग घेणार असल्याची अटकळ बांधण्यात आली. त्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये विजयला स्वतःच्या पक्षात घेण्याची चढाओढ लागल्याचे दिसून येते. अण्णाद्रमुक पक्षाचे प्रमुख इ. पलानीस्वामी आणि द्रमुकचे नेते, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, प्रत्येकाला राजकारणात येण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. “पैसे घेऊन मतदान करू नका”, असा संदेश विजयने विद्यार्थ्यांना दिला होता. त्याच्या या भूमिकेबाबत उदयनिधी यांना विचारले असता ते म्हणाले, विजयच्या मताशी मी सहमत आहे. हा चांगला संदेश आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनीही यावर भाष्य केले आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अण्णाद्रमुक पक्षासोबत अन्नामलाई यांचा शाब्दिक वाद ताजा आहे. अन्नामलाई म्हणाले, “आपल्या आई – वडीलांना सांगा पैसे घेऊन मतदान करू नका, असा संदेश विजयने दिला. विजयच्या मताचे आम्ही स्वागत करतो. आम्हीदेखील हाच संदेश देत असतो. पण जेव्हा विजय सारखा सुपरस्टार हा संदेश देतो, तेव्हा त्याचे महत्त्व आणखी वाढते.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हे वाचा >> आंबेडकर, पेरियार वाचा, फेक न्यूजपासून सावध रहा; तमिळ सुपरस्टार विजयचा विद्यार्थ्यांना संदेश

तमिळ राष्ट्रवादी नेते आणि नाम तमिलर कटची (Naam Tamilar Katchi – NTK) पक्षाचे प्रमुख आणि तमिळ सिने दिग्दर्शक सिमन यांनीही विजयच्या राजकारणातील प्रवेशावर भाष्य केले. विजय जर राजकारणात आला तर राज्यातील पर्यायी राजकारणाला आणखी बळ मिळेल. तसेच विजयच्या राजकारणातील प्रवेशामुळे आमच्या पक्षाचे नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया सिमन यांनी दिली. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सिमन यांच्या एनटीके पक्षाने सहा टक्के मतदान घेतले होते.

अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम (AMMK) पक्षाचे प्रमुख टीटीव्ही दिनकरन म्हणाले की, विजय सारखा जनमाणसांवर प्रभाव असलेला नेता पैसे घेऊन मतदान करू नका म्हणतो, ही चांगली बाब आहे. मतदार पैसे घेऊन मतदान करतात, ही सत्य गोष्ट विजयने मांडले आहे.

योगायोगाने दिनकरन यांच्यावर मागे एकदा मतदारांना प्रलोभन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपानंतर निवडणूक आयोगानेही या प्रकरणी लक्ष घातले होते.

तमीळनाडूमध्ये सिनेसृष्टीतील कलाकार कालांतराने राजकारणात सक्रिय होतात, ही सामान्य बाब आहे. विजयच्या राजकारणात प्रवेश करेल, असे संकेत खूप आधीपासूनच दिले गेले होते. विशेष म्हणजे विजयने ऑल इंडिया थलपथी विजय मक्कल इयाक्कम ही संघटना स्थापन केल्यानंतर तो राजकारणात प्रवेश करणार अशी अटकळ बांधली गेली होती. विजयच्या मागे सर्व वयोगटातील चाहते आहेत. ४८ वर्षीय विजय आजही युवकांना आकर्षित करतो.

Story img Loader