पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत असताना बुधवारी (१९ जुलै) व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील प्रकरणाबाबत खेद व्यक्त केला. दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना लाजिरवाणी असल्याचे ते म्हणाले. तसेच राजस्थान, छत्तीसगड आणि इतर राज्यात अशाच प्रकारच्या घडलेल्या घटनाही निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान आणि छत्तीसगडचे नाव घेतल्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “महिलांची सुरक्षितता आणि सन्मान यापेक्षा आमच्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे असू शकत नाही. जोधपूर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दोन तासांत आरोपींना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे मणिपूरमध्ये घडलेल्या लाजिरवाण्या घटनेनंतर भाजपा सरकारने ७७ दिवसांत फक्त एका आरोपीला अटक केली आहे. जर वेळेचाच उल्लेख करायचा झाल्यास आरोपींना धडा शिकवण्यात काँग्रेसला दोन तास लागले तर भाजपाला ७७ दिवस लागले.”

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

अशोक गेहलोत यांनी उल्लेख केलेली राजस्थानमधील सामूहिक बलात्काराची घटना १६ जुलै रोजी घडलेली आहे. जोधपूरमधील जय नारायण व्यास विद्यापीठातील कॅम्पसमध्ये तीन विद्यार्थ्यांनी एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील एक अल्पवयीन आरोपी मुलीचा मित्र होता. सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला लगेचच अटक केली.

मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील हिंसाचारात आतापर्यंत १४२ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही हिंसाचार थांबत नाही, हे खूप वेदनादायी आहे. मणिपूरची अवस्था पाहून आज संपूर्ण देश काळजीत आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी राखायची हे भाजपा सरकारला माहीत नाही का? असे प्रश्न आज राजस्थानची जनता विचारत आहे.

हे वाचा >> ‘पंतप्रधानांनी मणिपूरच्या घटनेवर सभागृहात बोलावे’, विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभा तहकूब

दुसरीकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेत प्रत्युत्तर दिले. विधानसभेत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मणिपूरविषयी बोलत असताना पंतप्रधानांनी राजस्थान आणि छत्तीसगडचे नाव विनाकारण घेतले असल्याचे ते म्हणाले. “मागच्या दोन महिन्याहून अधिक काळापासून मणिपूरात अग्नितांडव सुरू आहे. पण पंतप्रधानांनी त्यावर अवाक्षर काढले नाही. आज पहिल्यांदाच ते अखेर बोलले. पण त्यांनी मणिपूरच्या घटनेवर ठोस वक्तव्य करण्याऐवजी राजस्थान आणि छत्तीसगडचे नाव ओढूनताणून जोडले. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगडमध्ये येऊन गेले, तेव्हा त्यांना राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेसंबंधी काहीच तक्रार नव्हती. पण आताच त्यांना मणिपूरची तुलना राजस्थान आणि छत्तीसगडशी करावी का लागत आहे? त्याचे उत्तर म्हणजे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुका. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या न्यायालय आणि रुग्णालयात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत शब्दही काढला नाही किंवा मध्य प्रदेशमध्ये आदिवासी व्यक्तीला जी विकृत वागणूक दिली, त्यावरही ते कधीच बोलले नाहीत.” अशा शब्दात मुख्यमंत्री बघेल यांनी मोदींवर टिका केली.

आणखी वाचा >> Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?

भूपेश सिंह बघेल पुढे म्हणाले, “मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला असताना पंतप्रधान मोदी तिथे दौरा का करत नाहीत? “पंतप्रधान परदेश दौरे करत आहेत. छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये पक्षाचा प्रचारासाठी वेळ देत आहेत. पण मणिपूरमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना देशातील नागरिकांचे लक्ष मणिपूरच्या हिंसाचारावरून इतर ठिकाणी वळवायचे आहे. म्हणूनच ते मणिपूरची तुलना इतर शांतताप्रिय राज्यांशी करत आहेत. त्यांनी आता खोटे बोलणे थांबविले पाहीजे.”

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाचे कामकाज फलदायी ठरावे, विधेयकांवर चर्चा व्हावी, अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली होती. तसेच मणिपूरच्या व्हिडिओचा उल्लेख करत त्या घटनेचा निषेधही केला. “आज मी लोकशाहीच्या या मंदिराजवळ तुमच्यासमोर उभा असताना माझ्या हृदयाला असंख्य वेदना होत आहेत, तसेच रागही येत आहे. मणिपूरची घटना कोणत्याही सभ्य समाजाची मान खाली घालायला लावणारी आहे. राजस्थान, छत्तीसगढ किंवा मणिपूर असो, कोणत्याही राज्यात अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर त्यांना राजकारणाच्या वर जाऊन पाहीले पाहीजे”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Story img Loader