अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेक प्रसंगी राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप राम मंदिराचा वापर करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे शेवटचे राजा महाराजा हरि सिंग यांचे पुत्र डॉ. करण सिंग यांचे वक्तव्य आता समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असेल तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास अजिबात संकोच करू नये, असे ते म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिकृत निवेदन जारी करताना करण सिंग म्हणाले की, मला २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी ११ लाख रुपयांची माफक वैयक्तिक देणगी मी दिली आहे, यात सहभागी होताना खूप आनंद झाला असता. हा सण जगभरातील सुमारे एक अब्ज हिंदू साजरा करतील. दुर्दैवाने मी वयाची ९३ वर्षे पूर्ण केली आहेत आणि वैद्यकीय कारणास्तव मला कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. ते पुढे म्हणाले की, आमचा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट (J&K) जम्मूतील आमच्या प्रसिद्ध श्रीरघुनाथ मंदिरात या निमित्ताने एका विशेष उत्सवाचे आयोजन करीत आहे आणि आम्ही हा कार्यक्रम लोधी रोडवरील आमच्या श्रीराम मंदिरात आयोजित करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुम्हाला कोणत्याही समारंभाचे निमंत्रण देण्यात आले असेल तर त्यात सहभागी होण्यास अजिबात संकोच करू नये, असंही त्यांनी काँग्रेसला सांगितलंय.

हेही वाचाः गुजरात काँग्रेसमध्ये राम मंदिर सोहळ्यावरून मतमतांतर, मोठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत!

जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे डोगरा शासक महाराजा हरी सिंग यांचे पुत्र ९३ वर्षीय करण सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांना ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे सुंदर आमंत्रण मिळाले आहे, परंतु ते वैद्यकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. खेदाची बाब म्हणजे माझे वय ९३च्या जवळपास असून, वैद्यकीय कारणास्तव मला अयोध्येत येणे शक्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमंत्रित असल्यास कार्यक्रमास उपस्थित राहण्यास अजिबात कोणीही संकोच करू नये,” असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

हेही वाचाः जमीन सुधारणा विधेयकावरून केरळ सरकार अन् राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात खडाजंगी, नेमका वाद काय?

१९४७ पासूनच्या जम्मू आणि काश्मीरच्या अशांत प्रदेशात ज्यांनी आपले आयुष्य घालवले, त्या करण सिंग यांच्या विधानाला राम मंदिर कार्यक्रमाचे काँग्रेसनं निमंत्रण नाकारल्यामुळे महत्त्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. शुक्रवारी काँग्रेसनं सांगितलं की, ज्यांची श्रद्धा आहे ते कार्यक्रमाला आज ना उद्या जाऊ शकतात, हे ६ जानेवारी रोजीच आम्ही स्पष्ट केलंय. सातत्यानं आमच्यावर टीका करणे योग्य नसून हे भाजपचं षडयंत्र असल्याचाही काँग्रेसनं आरोप केलाय.

पुढे ते म्हणाले, “आम्हाला कोणाला, कोणत्याही धर्माला, कोणत्याही गुरूला दुखवायचे नाही. हा आमचा मुद्दा नाही. आमचा एकमेव मुद्दा (पंतप्रधान नरेंद्र) मोदीजींनी बेरोजगारी, महागाई, सीमाप्रश्न आणि चिनी (घुसखोरी) यावर लोकांसाठी काय केले आणि त्यांचे परराष्ट्र धोरण काय आहे हे सांगावे. जे गरीब उद्ध्वस्त झाले आणि ज्यांचा छळ झाला, आम्हाला त्यांची काळजी आहे, त्यामुळेच आम्ही पंतप्रधानांना प्रश्न विचारत असल्याचे काँग्रेसनं सांगितले.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी (१२ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजपला प्राणप्रतिष्ठेबाबतचे नियम पाळले जात आहेत का? असा सवाल उपस्थित केलाय. ते म्हणाले की, चार शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिराचे अभिषेक करता येत नाही, असे म्हटले आहे. शंकराचार्यांच्या पत्रावर प्रश्न उपस्थित करत पवन खेडा म्हणाले की, एका पत्रावर व्यवस्थापकाची तर दुसऱ्या पत्रावर स्वीय सचिवांची स्वाक्षरी आहे. तर खुद्द शंकराचार्यांचा व्हिडीओ सर्वांनी पाहिला आहे. यावरून आयटी सेल किती सक्रिय आहे हे दिसून येते. खरे तर चारही शंकराचार्यांनी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. नियमानुसार अभिषेक होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने भाजपला केला सवाल

पवन खेडा म्हणाले, प्राणप्रतिष्ठापना होते, तेव्हा त्यासाठी विधी असतो, हा कार्यक्रम धार्मिक आहे का? हा कार्यक्रम धार्मिक असेल तर परंपरेनुसार कार्यक्रम आयोजित केला जात आहे का? हा कार्यक्रम जर धार्मिक असेल तर आपल्या चार पीठांतील शंकराचार्यांच्या सल्ल्याने आणि देखरेखीने या कार्यक्रमाचे स्वरूप ठरवले जात आहे का?. पवन खेडा यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत भाजपवर तोफ डागलीय. ते म्हणाले की, चारही शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिराचे अभिषेक होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. हा कार्यक्रम धार्मिक नसेल तर मग हा कार्यक्रम राजकीय आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, देव आणि माझ्यामध्ये कोणी मध्यस्थ असू शकत नाही. प्राणप्रतिष्ठेची तारीख कोणत्या पंचांगातून तयार करण्यात आली आहे? निवडणुकीचे निरीक्षण करून तारीख निवडण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला. राजकीय तमाशासाठी एका माणूस देवाशी खेळताना आपण पाहू शकत नाही. देवाच्या कार्यक्रमात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मी आणि माझा देव यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. पवन खेडा म्हणाले की, प्राणप्रतिष्ठेमध्ये व्हीव्हीआयपींना प्रवेश देणारे भाजप कोण आहे. तुम्ही धर्माच्या आडूनही राजकारण करीत आहात. शंकराचार्य तिकडे जाणार नाहीत. ती एक राजकीय घटना असून, हा काही धार्मिक कार्यक्रम नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont hesitate to attend the ram temple ceremony jammu and kashmir karan singh says to congress vrd
First published on: 13-01-2024 at 22:35 IST