दिगंबर शिंदे
सांगली : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले. मराठवाड्यात याचे परिणाम काँग्रेस संघटनेवर अपेक्षित असताना पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत साशंकता निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षांतराचे परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट यांच्यावर तर होणार आहेतच, त्यापेक्षा भाजप निष्ठावंताना ‘सासूची वायली राहिले आणि सासूच वाटणीला आली’ अशी गत होण्याची भिती वाटत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या रूपाने फुलले. जत मतदार संघातून त्यांचा भाजपचे आमदार म्हणून विजय झाला. त्यावेळी काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने पडद्याआड राहून केलेली छुपी मदत कारणीभूत तर ठरलीच पण २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवेळी खासदार संजयकाका पाटील यांना विजयी करण्यात याच अदृष्य शक्तीचे पाठबळ मोठे होते. त्यामुळे जिल्ह्यात भाजप न म्हणता जेजीपी म्हणजेच जयंत जनता पार्टी असे उपरोधाने म्हटले जात होते. आता आयर्विन पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. औदुंबरचा डोह ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद संपुष्टात आणण्यासाठी असमर्थ ठरला. यातूनच भाजपची ताकद वाढत गेली. आज हाच भाजप जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने स्वबळावर काबीज करण्याच्या स्थितीत तर आला आहेच. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न नजीकच्या काळात पुढे येण्याची चिन्हे दिसत आहेत.
आणखी वाचा-शिंदे गटाचे कोल्हापूरमध्ये अधिवेशन, दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करत कमळ हाती घेतल्यानंतर काँग्रेसमधून काही आमदारही बाहेर पडण्याची शययता वर्तवली जात आहे. यात प्रामुख्याने पलूस-कडेगावचे आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे.चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देताच, डॉ. कदम यांनी केलेला खुलासाही अर्धसत्य सांगणाराच आहे. त्यांनी खुलासा करताना सांगितले की, मी काँग्रेसमध्येच आहे. यापुढील निर्णय मी माझ्या मतदार संघातील मतदारांना विश्वासात घेउनच घेणार आहे. म्हणजे त्यांनी ठामपणे मी काँग्रेसमधून बाहेर पडणारच नाही असे न सांगता मतदारांना विश्वासात घेउन निर्णय घेणार असल्याचे सांगत एक प्रकारे संशयाला जागा ठेवली असल्याने संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता किमान निवडणूक होईपर्यंत कायम राहणार आहे.
दुसर्या बाजूला पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेबाबत संशय सातत्याने संशयाचे ढग कायम दाटलेले असतात. त्यांनी कितीही मी पवार साहेबासोबतच असल्याचे ठामपणाने सांगितले असले तरी आतापर्यंत त्यांची राजकीय व्यूहरचना, त्यांची ख्याती पाहता त्यांच्या निष्ठेबाबत त्यांच्याच कार्यकर्ते खात्रीने सांगू शकत नाहीत हे वास्तव आहे.
आणखी वाचा-एनडीएमध्ये जयंत चौधरींची एन्ट्री; उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील आठ पैकी जत, पलूस-कडेगाव हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे, तर वाळवा आणि तासगाव-कवठेमहांकाळ आणि शिराळा हे तीन मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेस आणि पवार राष्ट्रवादीमध्ये संधी मिळत नसल्याने उपेक्षित राहिलेली मंडळी आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत म्हणजे महायुतीत सहभागी होत आहेत. यामुळे काँग्रेस आणि पवार राष्ट्रवादीला भविष्य फारसे आश्वासक आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
दोन दिग्गज नेत्यांच्याबाबत संशयाचे वातावरण असताना दोन्ही पक्षातील दुसर्या व तिसर्या फळीतील कार्यकर्ते अस्वस्थ असणे स्वाभाविक आहे. मात्र, यापेक्षा अधिक अस्वस्थता भाजपमध्ये गेलेल्यांची झाली आहे. ही मंडळी जर आमच्याच महायुतीत आली तर आमचा अवकाश व्यापण्याची भीती आहेच, पण आता कुठे पदाची संधी मिळण्याची चाहूल लागली असताना पुन्हा आमच्या वाट्याला जर हेच येणार असेल तर आमचे कसे या प्रश्नांने त्यांना ग्रासले आहे. एखादी सासरवाशीण खडूस सासूला वैतागून जर वायली राहिली आणि वाटण्या करताना सासूच वाटणीला आली तर तिची मानसिकता कशी असेल तीच मानसिकता आज भाजपमध्ये गेलेल्यांची झाली आहे.