सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाला बळ देणाऱ्या योजनांचे उल्लेख अर्थसंकल्पात करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. कराड असू शकतील, याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचा दावा केला जात आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

जायकवाडीमध्ये तरंगते सौरपटल बसवून दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याच्या कल्पनेला बळ देण्यात डॉ. कराड यांचा वाटा आहे. या प्रकल्पास लागणाऱ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात नाही. मात्र, या सौरउर्जा प्रकल्पाला प्रोत्साहन देऊन तो पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल असा संदेश देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाचा सर्व निधी केंद्र सरकारकडून मंजूर करुन घेण्यासाठी प्रयत्न करु असा दावा डॉ. कराड यांनी केला आहे. जायकवाडी धरणाचा परिसरात नसर्ग संवेदनशील प्रक्षेत्र म्हणून जाहीर आहे. त्यामुळे जायकवाडी येथे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. जायकवाडीच्या एकूण जलक्षेत्रापैकी सौरपटल टाकावयाच्या क्षेत्रापुरते ही ‘संवेदनशीलता’ काढून टाकावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यामार्फत केंद्राकडे केले जाणार आहे.

आणखी वाचा- महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी के कवितांचे दिल्लीत उपोषण; मोदी सरकारवर टीका

छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. कराड आग्रही होते. विस्तारीकरण मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाला आवश्यक असणारी तरतूदही आता अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे कराड हेच लोकसभेचे उमेदवार असू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी डॉ. कराड यांना आधी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्री करण्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यानंतर लोकसभा मतदारसंघात दौरे करणाऱ्या डॉ. कराड यांच्या कामाला वेग देणाऱ्या घोषणांचे उल्लेख अर्थसंकल्पात आवर्जून करण्यात आले. या अनुषंगाने दिलेली निवेदने आणि भाषण ऐकल्यानंतर मणीपूर दौऱ्यावर असणाऱ्या डॉ. कराड यांनी फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी मुंबईला जाऊन खास भेट घेतली.

आणखी वाचा- ‘ईडी’चा ससेमिरा सुरू असताना ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक

निधी आणि संकल्पाच्या पुढे जात या घटनाक्रमांचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. गेल्या काही दिवसात बँकांच्या मदतीने कर्ज मेळावे घेत डॉ. कराड यांनी ग्रामीण भागातील दौरेही वाढविले आहेत. लोकसभा बांधणीसाठी भाजपने ठरवून दिलेल्या कार्यक्रमातही डॉ. कराड यांचे ठळकपणे वावरणे आणि ते सूचवत असणाऱ्या योजनांचा अर्थसंकल्पातील उल्लेख याचे राजकीय अर्थ डॉ. कराड यांच्या लोकसभा उमेदवारीला पुरक असतील, असे भाजपमधील त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.

Story img Loader