संतोष प्रधान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने राज्यातून एकूण मत मूल्यांच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मुर्मू यांना मिळू शकतात. भाजप उमेदवाराला शिंदे गटाच्या ४० तर त्यांच्याबरोबर असलेल्या १० अपक्षांनी आधीच पाठिंबा जाहीर केला होता. खासदारांच्या दबावानंतर पक्षातील फूट टाळण्यासाठीच बहुधा शिवसेनेनेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. यासाठी आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर संधी हे कारण पुढे करण्यात आले असले तरी खासदारांचा गट फुटू नये यासाठीच ही खबरदारी शिवसेनेने घेतल्याचे मानले जाते.

उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
loksatta editorial on school droupout
अग्रलेख : शाळागळतीचे त्रैराशिक!

शिवसेनेचे सर्व ५५ आमदार आणि २१ खासदारांची मते भाजपच्या मुर्मू यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्याच आठवड्यात शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर १६४ मते मिळाली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मत अधिक केल्यास १६५ आमदार सरकारच्या बरोबर आहेत. त्यात शिवसेनेच्या १५ आमदारांची भर पडली आहे. याशिवाय काही अपक्ष पाठिंबा देऊ शकतात. यामुळेच आमदारांची किमान १८० मते राज्यातून मुर्मू यांना मिळू शकतात. आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ आहे. यामुळे विधानसभेच्या ५०,२२५ मत मूल्यांपैकी ३१,५०० मतांचे मूल्य हे भाजपच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- पक्ष संघटनेवरील नियंत्रणासाठी शिंदे गट आक्रमक

लोकसभेचे ४८ तर राज्यसभेचे १९ अशा एकूण ६७ खासदारांपैकी ५४ खासदार हे भाजप-शिवसेना युतीचे तर राष्ट्रवादी व काँग्रेसचे १३ खासदार आहेत. खासदाराच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० आहे. राज्यातील उभय सभागृहांमधील खासदारांचे एकूण मतांचे मूल्य हे ४६,९०० एवढे आहे. यापैकी ३७,८०० मते ही युतीची आहेत. कागदावरील आकडेवारीनुसार खासदारांचे ३७,८०० तर आमदारांचे ३१,५०० मतांचे मूल्य भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना मिळू शकते. याचाच अर्थ राज्यातील ९७,१२५ एकूण मत मूल्यांपैकी ६९,३०० मतांचे मूल्य हे भाजप-शिवसेना- रिपब्लिकन आठवले-अपक्ष गटांचे होते. ही सारी मते मिळाल्यास मुर्मू यांना राज्यातून ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळू शकतात. अर्थात, शिवसेनेच्या सर्व खासदार व आमदारांची मते मिळाली तरच हे गणित जमू शकते. कारण शिवसेनेच्या काही खासदार व आमदारांचा मुर्मू यांना पाठिंबा देण्यास विरोध आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपला राज्यातून जास्त मतांची अपेक्षा नव्हती. तेव्हा महाविकास आघाडीकडे आमदारांची १७० मते होती. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि शिवसेनेचा बदललेला सूर यामुळे भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १८० पर्यंत गेली. शिवसेनेच्या २१ खासदारांची भरही भाजपच्या मतांमध्ये पडली आहे.

लोकसभा खासदाराचे प्रति मतांचे मूल्य – ७००

लोकसभा ४८ व राज्यसभा १९

एकूण खासदार संख्या – ६७

भाजप, शिवसेना व अपक्ष खासदारांची संख्या – ५४

राष्ट्रवादी व काँग्रेस – १३

भाजप उमेदवार मुर्मू यांना ३७,८०० मते मूल्य मिळण्याची शक्यता

राज्यातील आमदारांचे प्रत्येक मताचे मूल्य – १७५

आमदार २८७ (एक जागा रिक्त)

भाजप, शिंदे गट, अपक्ष,

छोटे पक्ष व शिवसेना – १८०भाजपला मिळू शकतात ३१,५०० मतांचे मूल्य

Story img Loader