अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. यात जिल्हा परिषदेचे सभापती दिलीप भोईर, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकांसाठी केलेली पेरणी वाया गेल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले तर आरक्षणाच्या कचाटयातून सुटका झाल्याने काही जणांनी आनंदही व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक ही विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी शनिवारी सोडतीच्यावेळी गर्दी केली होती. सुरूवातीला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण जाहीर झाले. त्यात माणगावचे अॅड. राजीव साबळे आणि प्रमोद घोसाळकर इच्छूक असलेला लोणेरे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. तर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांचा मापगाव मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव झाल्याने त्यांना नवीन मतदार संघ शोधावा लागणार आहे. आजच्या आरक्षणात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचा चौल मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती गीता जाधव यांचा महागाव मतदारसंघ ओबींसींसाठी राखीव झाल्याने त्यांची संधी हुकणार आहे.

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
maharshtra sadan
महाराष्ट्र सदनातील त्रुटी दूर होणे आवश्यक, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा; स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन
Emphasis on exports of finished goods Prime Minister appeals for value addition of raw materials
तयार मालाच्या निर्यातीवर भर; कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 
nashik raigad guardian minister
नाशिक, रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा, निर्णय प्रलंबित राहण्याची चिन्हे, शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली

हेही वाचा… साखर कारखाना, सूत गिरणी आणि निधीवाटपातून मुख्यमंत्री शिंदे यांची मराठवाड्यात नवी बांधणी

या निवडणुकीसाठी अनेकांनी पूर्वतयारी केली होती परंतु आरक्षणामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली आहे. शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे इच्छूक असलेला गोरेगाव मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे या तिथे उभ्या राहतील, अशी शक्यता आहे. अलिबागच्या शहापूर मतदार संघातून राष्ट्रावादीचे अमित नाईक तयारीत होते परंतु तो मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या ने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. वहूर मतदार संघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्य जितेंद्र सावंत यांची अडचण झाली आहे. याशिवाय किशोर जैन (नागोठणे) ,चंद्रकांत कळंबे (देवळे) यांचेही मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे.

आजच्या आरक्षणातून अनेकांची सुटकाही झाली आहे. विद्यमान अध्यक्षा अॅड. नीलिमा पाटील यांचा पाबळ मतदार संघ ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. मोर्बा मतदारसंघ खुला राहिल्याने अस्लम राऊत यांना संधी मिळू शकते. अनेकांचे मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना पर्यायी मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

पेणमधून ५ महिलांना संधी

पेण तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे पाच मतदार संघ होते. फेररचनेमध्ये ही संख्या एकने वाढून सहा झाली आहे. त्यातील पाच मतदारसंघ हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामध्ये जिते, दादर, वढाव, वडखळ हे सर्वसाधारण महिला तर पाबळ मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. एकमेव शिहू मतदारसंघ सर्वसाधारण राहिला आहे. म्हसळा तालुक्यासतील पाभरे व वरवठणे हे दोन्ही मतदारसंघ पहिल्यांदाच सर्वसाधारण राहिले आहेत.

रोह्यातूनही यंदा महिलांना संधी

रोहा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघापैकी चार मतदारसंघ हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. धाटावचा अपवाद सोडला तर वरसे, नागोठणे, आंबेवाडी, निडी हे चारही मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत.

Story img Loader