सुहास सरदेशमुख
औरंगाबाद – गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यासंबंधी केलेले वक्तव्य आणि शिक्षक व पदवीधर मतदार संघच रद्द करण्याविषयी मांडलेल्या भूमिकेने राज्यभर वादळ उठवून दिले आहे. त्यावर शिक्षक संघटना आणि शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आक्रमक झाले असून औरंगाबाादेत त्याचे पडसाद माेर्चाच्या माध्यमातून उमटले. या सर्व घडामाेडींकडे आगामी शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या नजरेतून पाहण्यात येत असून त्या अनुषंगाने भाजपकडून नव्या उमेदवारासाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा <<< ‘भारत जोडो’मुळे काँग्रेसचा ‘हत्ती’ जागा झालाय, काँग्रेसने बिगरभाजप पक्षांना ठणकावले!
आमदार प्रशांत बंब यांनी अलीकडेच विधान भवनात शिक्षकांकडून घरभाडे भत्ता खाेटी कागदपत्रे सादर करून देयके उचलण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला हाेता. त्यावरून माेठा गहजब निर्माण झाला. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, या आमदार बंब यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर शिक्षक संघटनांकडून निषेधाचे सूर उमटले. मात्र, आमदार बंब यांनी त्यांच्या वक्तव्याचा वारंवार पुनरुच्चार करून या मुद्यावरून आता माघार नाही, अशी भूमिकाही कायम ठेवली. शिक्षक दिनी मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचेे पाद्यपूजनही त्यांनी केले. शिक्षकांसह शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करण्याची मागणीही आमदार बंब यांनी रेटून धरली आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारला एक पत्रही पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेविराेधात राज्यभरातील शिक्षक संघटना आणि शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचे आमदारही आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील, पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, आमदार डाॅ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली १८ ते २० शिक्षक संघटना एकवटून आमदार बंब यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माेर्चा काढण्यात आला. आमदार बंब यांना खासगी शाळांचे भरण-पाेषण करायचे अ्सल्याने आणि त्यांचा पक्ष हा घटनाच बदलायला निघालेला आहे, या आरोपांबरोबरच इतरही अनेक आराेप माेर्चांनंतरच्या झालेल्या भाषणांतून करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेचीही उजळणी या निषेध माेर्चामधून करण्यात आली. कागदाेपत्री शिक्षक मुख्यालयी कसे राहतील, याचे धडेही देताना ग्रामपंयातीमध्ये ठराव घडवून आणावा, असेही माेर्चातून जाहीरपणे सांगण्यात आले. ७५ हजार विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश केल्याचेही यावेळी सांगितले. भरपावसात निघालेल्या या माेर्चामध्ये राज्यभरातून आलेले जिल्हा परिषदेचे तीन ते चार हजार शिक्षक सहभागी झाले हाेते. या माेर्चात करण्यात आलेल्या आराेपांचा आमदार बंब यांनी पाठाेपाठ प्रतिवादही केला. मुख्यालयी राहण्याच्या मुद्यातून आता माघार नाही, अशी भूमिका स्पष्ट करतानाच त्यांनी माेर्चाची हुकुमशाही आणि दबावगट म्हणून शेलकी टीकाही केली. यातून येत्या काळात हाेणाऱ्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीपर्यंत शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा तापता ठेवण्याचे संकेत दिले.
हेही वाचा <<<बावनकुळेंचे स्वप्न अन् शिंदे गटात चलबिचल
शिक्षकांमध्ये अ्स्वस्थता निर्माण करून भाजपने एकप्रकारे माेहाेळच उठवून दिल्याची पार्श्वभूमी आमदार बंब यांच्या वक्तव्यामागे दिसत असल्याचे मानले जात आहे. येत्या काळात मराठवाड्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. मराठवाड्यातील या मतदारसंघावर मागील सलग तीन निवडणुकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. आमदार विक्रम काळे हे या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत. २०१६-१७ च्या निवडणुकीत भाजपकडून भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सतीश पत्की हे उमेदवार हाेते. यावेळी पत्की यांच्याऐवजी भाजपला नव्या उमेदवाराचा शाेध आहे. पत्की तसेही फार सक्रिय दिसत नाहीत. पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादीचेच सतीश चव्हाण हे सलग तीनवेळा निवडून आलेले आहे. आमदार चव्हाण हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस असून या संस्थेचे मराठवाडाभर जाळे विस्तारलेले आहे. मंडळाच्या पावणे दाेनशेच्या आसपास शाखांच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागापर्यंत विस्तार झालेला आहे. या तुलनेत भाजपची ताकद दाेन्ही मतदारसंघात सध्यातरी फारशी दिसत नसून त्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या नजरेतून आमदार बंब यांनी केलेल्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित उमेदवार शिक्षकांपुढे पर्याय ठेवण्यासाठीचीही रणनीती यामागे असल्याची चर्चा आहे.