चंद्रशेखर बोबडे

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार व भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्यापुढे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षक परिषद या दोन शिक्षक संघटनांनी आव्हान उभे केले असले तरी त्यांच्यामुळे भाजपविरोधी व धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. मात्र शिक्षक भारतीने ही बाब फेटाळून लावली आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, भाजप समर्थित परिषदेचे नागोराव गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात चुरशीची लढत आहे. विशेष म्हणजे शिक्षक भारती आणि विदर्भ माध्यमिकि संघ या दोन्ही संघटना भाजप विरोधी विचारसरणीच्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे उमेदवार रिंगणात असल्याने धर्मनिरपेक्ष व भाजप विरोधी मतांची विभागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा… विदर्भात गुंतवणूक करण्यासाठी दावोसमध्ये करार करणाऱ्या तीन कंपन्या महाराष्ट्रातीलच

शिक्षक मतदारसंघ हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा कधीकाळी बालेकिल्ला होता. त्यामुळे शिक्षक भारतीने उमेदवार उभा करून मतविभाजनाची बिजे रोवली, अशी टीका संघटनेचे प्रमुख आमदार कपिल पाटील यांच्यावर टीका होत आहे. त्यांची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडणारी असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे. शिक्षक भारतीने काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. पण पक्षाने त्यांना नाकारला त्यामुळे शिक्षक भारतीची नाराजी आहे. यासंदर्भात आमदार कपील पाटील यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात ती व्यक्तही केली होती. काँग्रेसने आम्हाला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही, असा आरोपच त्यांनी काँग्रेसवर केला होता. मात्र काँग्रेसने पाटील यांचा पाठिंब्याचा दावा सपशेल फेटाळला.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, तो पाठिंब्यासाठी एखाद्या मतदारसंघापुरता मर्यादित विचार करू शकत नाही. पदवीधर मतदारसंघात काय वाटाघाटी झाल्या हे त्यावेळच्या परिस्थिती अनुरूप असतील म्हणून या निवडणुकीत पाठिंब्याचा आग्रह धरणे संयुक्तिक ठरत नाही. राज्याच्या राजकारणात आ. कपील पाटील भाजपचे विरोधक म्हणून ओळखले जात असताना नागपुरात त्यांच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी अटळ झाली आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे.

हेही वाचा… पुणे जिल्ह्यात माजी खासदार-आमदारांचे पुनर्वसन

मात्र शिक्षक भारतीने ही बाब फेटाळून लावली. संघनटेचे उमेदवार राजेंद्र झाडे म्हणाले, आमच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होईल,असे म्हणने चूक आहे. निवडणुकीत मतदार हे शिक्षक असून ते समजदार आहेत. महाविकास आघाडीने जरी माध्यमिक शिक्षक संघाला पाठिंबा दिला असता तरी भाजप विरोधी व धर्मनिरपेक्ष सर्व मते ही शिक्षक भारतीलाच मिळतील. त्यात विभाजन होणार नाही. २०१७ च्या निवडणुकीत आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे यावेळी निवडणूक लढण्याचा आमचा नैसर्गिक दावा होता. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणूनच आम्ही काँग्रेसला पाठिंबा मागितला होता. याच मुद्यावरआम्ही त्यांना पदवीधरमतदारसंघात मदत केली होती. काँग्रेस नेत्यांनी पाठिंब्याचा शब्द दिला होता व म्हणूनच आम्हाला अपेक्षा होती. पण नंतर त्यांनी निर्णय बदलला, असे झाडे म्हणाले.