महेश बोकडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींकडून विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठविणे अपेक्षित असते. परंतु नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधकांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तर सत्ताधारी विरोधकांच्या विरोधात घोषणा देतात.

दिवसेंदिवस या घोषणांचा स्तर खालावत चालला आहे. घोषणा देताना होणारा असांसदीय व शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचे चित्र आहे. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विरोधक विरुद्ध सत्ताधारी असे आंदोलन सुरू आहे. ‘५० खोके, एकदम ओके’ या विरोधकांच्या घोषणेला सत्ताधारी आमदारांकडून ‘५० आमदार एकदम ओके, घरी बसले माजलेले बोके’ असे प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी सोमवारी घोषणायुद्ध सुरू झाले.

हेही वाचा: नितीन कुंभलकर : उत्तम नियोजनकार

‘भूखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, द्या खोके-भूखंड ओके,’ ‘खाऊन खाऊन पन्नास खोके-माजले बोके, माजले बोके’, ‘रावणाच्या औलादींचे करायचे काय, खाली डोके वरती पाय,’ गली-गली मे शोर है मुख्यमंत्री चोर है’ या विरोधी पक्षाच्या घोषणांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही ‘देशके गद्दारो को, जुते मारो सालोंको’, ‘दाऊद के दलालो को, जुते मारो सालोंको’ या घोषणांनी प्रतिउत्तर देण्यात आले… घोषणा देताना त्यात वापरण्यात येणारे शब्द असांसदीय व शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे.

हेही वाचा: वादग्रस्त कालीचरण महाराज आहेत तरी कोण?

मुळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करणे कितपत संयुक्तिक आहे, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो. सभागृहात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधता येते. मग बाहेर घोषणाबाजी कशाला ? सारे प्रसिद्धीसाठी सुरू असते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During winter session nagpur level of sloganeering and demonstrations between the shinde fadanvis government and the mva has gone down print politics news tmb 01