पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. भाजपासारखा मोठा पक्ष या निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागला आहे. या निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची आणि कोणाला डावलायचं याचा विचार भाजपाने आतापासून सुरू केला आहे. असे असतानाच हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी (जननायक जनता पार्टी) यांच्यातील युती कायम राहणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. यावरच जेजेपी पक्षाचे सर्वेसर्वा तथा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाष्य केले आहे. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी भाजपा-जेजेपी युतीसंदर्भात सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर या दोन पक्षांच्या युतीसंदर्भात संदिग्धता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मला कसे समजणार? मी ज्योतिषी नाही

चौटाला यांना पत्रकार परिषदेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विचारण्यात आले. तसेच भाविष्यात भाजपा-जेजेपी यांच्यातील युती कायम राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना भविष्यात काय आहे हे मला कसे समजणार? मी ज्योतिषी नाही, अशी सावध प्रतिक्रिया चौटाला यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जेजेपी किती जागांवर निवडणूक लढवणार? या प्रश्नांचेही त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. “आम्ही किती जागा लढवणार हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र आमचा पक्ष हरियाणामधील सर्व दहा लोकसभेच्या जागांवरून लढण्याची तयारी करत आहे,” असे चौटाला म्हणाले.

चौटाला यांनी बदलली भूमिका

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात चौटाला यांनी युतीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि आम्ही सोबत निवडणूक लढवू, असे चौटाला स्पष्टपणे म्हणाले होते. आता मात्र त्यांनी आपली भूमिका बदलेली आहे. आम्ही सर्व १० जागा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असे चौटाला म्हणत आहेत. चौटाला यांनी अवघ्या चार ते पाच महिन्यांत आपली भूमिका का बदलली, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात

भाजपानेदेखील आगामी निवडणूक एकट्यानेच लढण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत हरियाणातील सर्व दहा लोकसभेच्या जागांवर कमळ फुलेल, असे खुद्द केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह म्हणाले आहेत. लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये २०२४ साली ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे भाजपा आणि जेजेपी हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.

जेजेपी पक्षाचा दहा जागांवर विजय झाला होता

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ९० जागांपैकी भाजपाने येथे ४० जागांवर विजय मिळवला होता. बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे भाजपाने पुढे जेजेपी पक्षाशी युती केली. जेजेपी पक्षाचा दहा जागांवर विजय झाला होता. दरम्यान, आता वर्षभरात येथे लोकसभा आणि साधारण दीड वर्षांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे यावेळी चौटाला यांच्यामागे मतदार आहेत का? याची तपासणी भाजपाकडून केली जात आहे. मागील निवडणुकीत जेजेपी पक्षाला जाट समाजातील मतदारांचा पाठिंबा लाभला होता. मात्र काँग्रेसने यावेळी जाट समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूपिंदरसिंह हुडा यांचे विश्वासू असलेले उदय भान यांच्याकडे हरियाणाचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले आहे. त्यामुळे जाट मतदार त्यांच्याकडे ओढला जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे भाजपा चौटाला यांची उपयोगीता तपासत आहे, असे म्हटले जात आहे.

यावेळी शेतकरी जेजेपी पक्षावर नाराज आहेत?

जेजेपी पक्षाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतो. मात्र केंद्र सरकारने लागू करून मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे जेजेपीने भाजपासोबतची असलेली युती तोडावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र जेजेपीने आपली ही युती कायम ठेवली. या कारणामुळेच यावेळी शेतकरी जेजेपी पक्षावर नाराज आहेत, असेही भाजपा नेत्यांचे मत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जेजेपीशी युती करावी का? याची भाजपाकडून चाचपणी केली जात आहे.

प्रसिद्ध घराण्यांच्या मदतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

हरियाणामध्ये जनाधार वाढवण्यासाठी भाजपा तेथील प्रभावशाली घराण्यातील सदस्यांची मदत घेत आहे. भाजपा माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र तथा आमदार रणजितसिंह चौटाला यांच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. रणजितसिंह चौटाला हे मनोहरलाल खट्टर सरकारमध्ये मंत्री आहेत. रणजितसिंह चौटाला आगामी निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढवणार आहेत. भाजपाने देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांची राज्य कृषी विपणन मंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. या सर्व नियुक्त्यांचा आगामी निवडणुकीत फायदा होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे.

दरम्यान, जेजेपी आणि भाजपा यांच्यातील युतीवर भाजपाच्या नेत्यांमध्येही संदिग्धता आहे. भाजपाच्या नेत्यांचे या विषयावर वेगवेगळे मत आहे. भाजपाचे नेते चौधरी बिरेंद्रसिंह यांनी या युतीवर काही महिन्यांपूर्वी भाष्य केले होते. “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे भाजपाला कोणाचीतरी मदत हवी होती. परिणामी भाजपाने जेजेपीशी युती केली. ही युती पाच वर्षांसाठी आहे. मात्र ती भाविष्यातही टिकेल असे मला वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया बिरेंद्रसिंह यांनी दिली. बिरेंद्रसिंह यांच्या या विधानावर चौटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाच्या मनात अगोदरपासूनच द्वेष असेल तर मी त्याबाबत काहीही करू शकत नाही. मागील साडेतीन वर्षांत आम्ही चांगले काम केलेले आहे. दोंघानीही मिळून राज्याच्या प्रगतीसाठी उत्तम काम केले आहे,” असे चौटाला म्हणाले आहेत. म्हणूनच भविष्यात भाजपा आणि जेजेपी यांच्यात युती होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.