छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचा एकत्रित दसरा मेळावा आणि याच जिल्ह्यातील नारायण गड येथील मनोज जरांगे यांचा विजयादशमीच्या महोत्सवातील भाषणांवर मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीची प्रचारदिशा स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय पटलाववर व्यक्त केली जात आहे.

परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. तसे त्यांनी समाज माध्यमांवर अधिकृतपणे जाहीर केले. दसरा मेळाव्याची तयारी जशी परळीसह मराठवाड्यात सुरू झाली आहे, तशीच ती नारायण गडावरही सुरू झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे या वर्षी दसरा मेळावा घेणार असल्याने पुन्हा एकदा ‘ मतपेढी’ च्या मतपेरणीचा खेळ मराठवाड्यात रंगेल असा अंदजा वर्तवला जात आहे. दसरा मेळाव्यातून राजकीय दिशा देण्याची कार्यशैली बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली. २०१४ नंतर बीड जिल्ह्यातील सावरगावघाट येथे दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली. तत्पूर्वी भगवानगडावर हा मेळावा घेतला जात असे. या मेळाव्यात झालेल्या वादानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने भगवानगडावर मेळावा घेण्यास मज्जाव करण्यात आला. सावरगाव घाट येथील मेळाव्यातून २०१४ ते २०२४ या दहा वर्षात पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय पटलावरील सुंदोपसुंदी समोर येत असे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!

हेही वाचा >>> Samsung Strike : हजारो सॅमसंग कर्मचाऱ्यांचा महिनाभरापासून संप; अनेक बैठका निष्फळ, मागण्या मान्य करण्यास सरकार का ठरतंय अपयशी?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावरील रोष व्यक्त करणाऱ्यांची मोट या मेळाव्यातून बांधण्याचा प्रयत्न होत असे. मात्र, २०२३ पासून यात मोठे बदल झाले. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी आपले राजकीय वैर संपवून बहीण – भावाचे नातेच राजकीय पटलावर असेल असे चित्र संकेत दिले. तत्पूर्वी राज्याच्या राजकारणात ‘ पहाटेचा शपथविधी’ झाला होता. तेव्हा त्यातही धनंजय मुंडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्याची चर्चा राजकीय पटलावर होती. अजित पवार यांनी भाजपबरोबर यावे या प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडे यांची बऱ्याच हालचाली केल्या होत्या, हेही बीडमधील राजकीय जाणकारांना माहीत आहे. त्यामुळे या वेळी परळी विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ कमळ’ हे चिन्ह असणार नाही. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यास धनंजय मुंडे हजर राहणार आहेत.

हेही वाचा >>> ठाण्याच्या जागेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच, शहरभर लागले ‘दादाचं काम बोलतंय’चे फलक

लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात ‘ मराठा विरुद्ध ओबीसी’ असे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले. जरांगे यांनी महाविकास आघाडीशी छुपी युती केल्यामुळे भाजपला मराठवाड्यात फटका बसल्याचा आरोप अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे जरांगे आणि मुंडे बहीण- भाऊ दसरा मेळाव्यात कोणत्या भूमिका व्यक्त करतात, यावर मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीची प्रचार दिशा ठरेल असे सांगण्यात येत आहे.

Story img Loader