Delhi Assembly Election 2025 : सध्या राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात निवडणूक आयोगाने निवडणुकीत उमेदवारांना विविध वस्तूंवर जास्तीत जास्त किती खर्च करता येईल याचे दरपत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोग बाजारातील विक्रेते, राजकीय पक्ष आणि विविध घटकांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे वस्तूनिहाय दर निश्चित करतो. बहुतेक मतदारसंघांमध्ये किंमतीच्या मर्यादा एकसारख्या असतात, तर काही वस्तूंच्या किंमती स्थानिक बाजारभावानुसार ठरवल्या जातात.

या व्यतिरिक्त, प्रत्येक विधानसभा उमेदवाराला निवडणूक आयोगाने ४० लाख रुपयेपर्यंतच्या खर्चाची मर्यादा घातली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी, हीच मर्यादा ९५ लाख रुपये इतकी आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांनी निवडणुकी दरम्यान उमेदवारांनी करण्याच्या खर्चाच्या मर्यादेत गेल्या काही वर्षांत वाढ केली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये लोकसभा उमेदवारांसाठी ७० लाख रुपये आणि विधानसभा उमेदवारांसाठी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. दरम्यान उमेदवार ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करतो तेव्हापासून निकाल लागेपर्यंत तो करत असलेला खर्च मोजला जातो.

ChatGPT Down
ChatGPT Down : ChatGPT ची सेवा ठप्प! भारतासह जगभरातील युजर्सची कामे खोळंबली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडणार? उदय सामंत यांच्या नावाची का होत आहे चर्चा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

यावेळी निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि प्रचार सभांना उपस्थित राहणाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचे सविस्तर दरपत्रकही जाहीर केले आहे. यामध्ये दिल्लीतील लोकप्रिय पदार्थ, छोले-कुलचे आणि छोले-भटुरे यांच्यासाठी अनुक्रमे ३५ आणि ४० रुपये दर निश्चित केला आहे. तर, समोसा, ब्रेड पकोडा, लाडू आणि गुलाब जामुनच्या प्रत्येक नगाची किंमत १२ रुपये ठरवण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक १०० मिली चहाचा दर ६ रुपये कॉफीची दर १२ रुपये ठरवला आहे. तसेच दुपार आणि रात्रीच्या जेवणाची किंमत किंमत ७० रुपयांपेक्षा जास्त असू नये असे निश्चित केले आहे.

प्राण्याच्या वापरावर किती खर्च?

निवडणूक आयोगाने झेंडे, पोस्टर्स, हँडबिल, होर्डिंग्ज, कट-आउट्स आणि वेगवेगळ्या आकाराचे स्टिकर्स यांच्यासाठीही वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. पक्षाच्या निवडणूक कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेनांचा दरही प्रत्येक नगामागे ६ रुपये इतका आहे. पक्षाचे चिन्ह आणि उमेदवारांचे फोटो असलेले मनगट पट्टे आणि घड्याळे यांचा दर अनुक्रमे ४ रुपये आणि ३०८ रुपये इतका ठरवला आहे. प्रचार कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाद्यांमध्ये, ढोल वाजवणाऱ्याला दर दररोज ५०० रुपये हजेरी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान रोड शोसाठी प्राण्यांचा वापर करणाऱ्य उमेदवारांना, घोड्यासाठी जास्तीत जास्त ३,०७५ रुपये आणि हत्तीसाठी ६,१५० रुपयेच देता येणार आहेत. असे असले तरी यासाठी उमेदवारांना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

एका दिवसाच्या ड्रोन वापरासाठी ७ हजार रुपये

निवडणूक प्रचारात तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक होत असल्याने, पक्षांच्या रॅली आणि रोड शोचे लाईव्ह स्ट्रीमिंगचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने एलईडी आणि एलसीडी डिस्प्ले स्क्रीनच्या किमतींव्यतिरिक्त ड्रोनच्या वापरासाठी दररोज ७,००० रुपये दर निश्चित केले आहेत.

प्रचार कार्यक्रमांमध्ये उमेदवार आणि इतर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हारांचेही वेगवेगळे दर ठरवले आहेत. प्रत्येक लहान हाराची किंमत २० रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही, तर १० फूट हारांची किंमत १५०० रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. स्टेजच्या सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांची किंमत प्रति चौरस फूट ३५ रुपये निश्चित केली आहे.

निवडणूक खर्चाचे विवरण

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक उमेदवाराला निवडणूक कालावधीत तीन वेगवेगळ्या तारखांना खर्चाचा हिशेब सादर करावा लागतो. तर निवडणूक पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे त्यांच्या संपूर्ण खर्चाचे विवरण सादर करावे लागेते. जिल्हा निवडणूक कार्यालये प्रत्येक प्रचार कार्यक्रमात त्यांचे प्रतिनिधी पाठवतात जेणेकरून अधिसूचित दर यादीचे पालन केले जाईल. यावेळी सर्व व्यवस्थांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. दिल्ली विधानसभा उमेदवारांना छोले भटूऱ्यावर ३५ रुपये तर रॅलीमध्ये हत्तीसाठी खर्च करता येणार ६१५० रुपये, निवडणूक आयोगाने निश्चित केले दर

Story img Loader