मुंबई: मवळत्या विधानसभेची मुदत मंगळवारी संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पार पडताच लगेचच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या २८८ सदस्यांची नावांची यादी व राजपत्राची प्रत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना रविवारी सायंकाळी सादर केली. ही प्रक्रिया पार पडल्याने १५वी विधानसभा आता अस्तित्वात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा >>> नवे सरकार स्थापन झाले की सामूहिक उपोषणाची तारीख; मनोज जरांगे यांचे प्रतिपादन

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहेत. १५वी विधानसभा अस्तित्वात आल्याने आता कायदेशीर पेच कोणताही येणार नाही. नवीन विधानसभेच्या पहिल्या बैठकीपासून पुढील पाच वर्षे विधानसभेची मुदत ग्राह्य धरली जाते.

नव्या सरकारच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्यात नवीन विधानसभा अस्तिवात आल्यानंतर आता नव्या सरकारच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांकडे आपला राजीनामा सूपूर्द करावा लागेल. त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची सूचना करतील. महायुतीचा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीनंतर सरकार स्थापण्याचा दावा केला जाईल. त्यानंतरच शपथविधी समारंभ पार पडेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec submitted list of 288 elected members to governor cp radhakrishnan print politics news zws