महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रोच्या जागेवर छापा टाकला. महाराष्ट्र विधानसभेतील कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (३८) हे बारामती अ‍ॅग्रोचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.

मनी लाँड्रिंग कारवाई मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (EOW) शाखेच्या ऑगस्ट २०१९ च्या FIR वर आधारित आहे. त्याच वर्षी २२ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सहकारी क्षेत्रातील साखर कारखानदारांच्या कथित फसव्या पद्धतींद्वारे विक्री केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. साखर कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री केली, असे न्यायालयाने आपल्या टिपणीत म्हटले होते. यातील एक साखर कारखाना रोहित पवार यांनीही घेतला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेने एफआयआर नोंदवला होता.

रोहित पवारच्या कंपनीविरुद्ध ईडीची चौकशी महाराष्ट्रातील तोट्यात चाललेल्या सहकारी साखर कारखान्याच्या (CSF) खरेदीसाठी बोली लावणाऱ्या कंपनीने निधी आणि आगाऊ निधी वळवल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बारामती अ‍ॅग्रोच्या सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याचा तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करून रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखान्याची ५० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा तपास जलद गतीने करण्याची आम्ही ईडीला विनंती केली आहे,’ असंही किरीट सोमय्या तेव्हा म्हणाले होते.

Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
minister ashish shelar criticized sharad pawar over conflict in mva
शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला सुरुवात : आशिष शेलार
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…

कारखाने आरोपींच्या नातेवाईकांनी बाजार मूल्यापेक्षा खूपच कमी किमतीत विकत घेतले, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना NCP (शरद पवार गट) चे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले की, ईडीद्वारे केलेल्या शोधामुळे रोहित पवार घाबरणार नाहीत किंवा त्यांना त्यांच्या मार्गापासून परावृत्त करता येणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमधून रोहित पहिल्यांदाच आमदार झाला आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादीचे प्रवक्ते?

“आम्ही आणखी मजबूत होऊ,” असा दावाही क्रॅस्टो यांनी केला आहे. संघर्ष यात्रेने भाजपला अस्वस्थ आणि असुरक्षित बनवले आहे हे स्पष्ट झाले आहे.”न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे आणि सत्य सर्वांसमोर येईल. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी ‘अन्याया’विरोधात लढण्याची शपथ घेतली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस ३८ वर्षीय रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील तरुणांचा प्रश्न मांडण्यासाठी पुणे ते नागपूर अशी पदयात्रा काढली होती. राज्यातील सामाजिक आणि राजकीय सुधारकांचे चित्र शेअर करताना रोहित पवार यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, या दिग्गजांनी महाराष्ट्रातील जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

ते म्हणाले, “अन्यायाशी लढण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.” राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचे परिणाम रोहित पवार यांना भोगावे लागत आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये पक्ष सोडला होता आणि इतर आठ आमदारांसह राज्यातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. माजी मंत्री आव्हाड म्हणाले, “आपलेच लोक आता दुसरीकडे (सत्ताधारी आघाडीचा भाग) आहेत हे दुःखद आहे. मला विश्वास आहे की, रोहित अशा दबावाला बळी पडणार नाही.”

सात महिन्यांपूर्वी शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात अनेक मतभेद असतानाही एकत्रितपणे संयुक्त आघाडी उभी केल्याने ही एकसंध राष्ट्रवादी होती. अजित पवारांनी बंड केल्यानंतर पक्ष फुटला आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये ते सामील झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्याच वेळी रोहित पवारांना चमकण्याची संधी मिळाली. त्यांनी आपली निष्ठा स्पष्टपणे सांगितली. अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच रोहित म्हणाले की, मी पूर्णपणे शरद पवारांच्या पाठीशी उभा आहे.

हेही वाचाः पांचजन्यमधून गंभीर आरोप; तरीही अयोध्या कार्यक्रमासाठी मूर्तींना विशेष आमंत्रण, कारण काय?

त्यावेळी पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले होते, “गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात जे काही घडत आहे, त्यामुळे राजकारण घाणेरडे झाल्याचे मतदार सांगत आहेत. त्यांना तिरस्कार वाटत आहे आणि त्यांनी मतदान करून चूक केली की काय, असे वाटू लागले आहे. काही आदर्शवाद घेऊन राजकारणात आलेले तरुण आमदारही चुकले की काय? असा प्रश्न पडतो. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना ते बगल देताना दिसत आहेत. नेते स्वतःच्या खुर्च्या सुरक्षित करण्याचा आणि त्यांची वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

हेही वाचाः ठाकरे गटाला शह देण्यासाठी परभणीत महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वंतत्र मोर्चेबांधणी

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते की, पक्षात फूट पडणे हा रोहितसाठी पक्षात वाढ होण्यासाठी एक योग्य क्षण असू शकतो. राष्ट्रवादीच्या एका सूत्राने सांगितले की, रोहित त्यांच्या मतदारसंघात आणि पक्षात लोकप्रिय झाला आहे. रोहितच्या एका जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, रोहित पवारांचे स्पष्ट बोलणे त्यांना फायदेशीर ठरू शकते. “अजित पवारांना सोडल्यास रोहित पवार भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्यात कधीही मागे हटले नाही.”

कर्तृत्व सिद्ध करण्याची संघर्ष यात्रेच्या रूपाने मोठी संधी

विशेष म्हणजे रोहित पवारांना अनेक संधी चालून आल्या आहेत. त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संघर्ष यात्रेच्या रूपाने मोठी संधी मिळाली. जी त्यांनी ऑक्टोबरमध्ये दसऱ्यापासून सुरू केली. पुणे ते नागपूर ८०० किमी पायी चालणारी ही यात्रा तरुणांसाठी तयार करण्यात आली होती, ती सुरू झाल्यानंतर त्यांनी चार दिवसांनी मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ मोर्चा वळवला. रोहितने १७ नोव्हेंबरला पुन्हा यात्रा सुरू केली आणि ती १० डिसेंबर रोजी संपली.

क्रिकेट प्रशासक ते आमदार

२०१९ मध्ये रोहित पवारांची पहिल्यांदा बातमी आली, जेव्हा त्याने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. बारामतीच्या कौटुंबिक बालेकिल्ल्यापासून दूर जिथे पवारांना कधीही पराभव पत्करावा लागला नाही. तिथे त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारमधील भाजपचे हेवीवेट मंत्री राम शिंदे यांचा ४० हजारांच्या फरकाने पराभव केला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत रोहित राष्ट्रवादीचा स्टार प्रचारकही होता. त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले.

कोण आहेत रोहित पवार?

शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचा रोहित पवार नातू आहे. शरद पवार यांचे मोठे भाऊ अप्पासाहेब पवार यांना राजेंद्र व रणजीत ही दोन मुले आहेत. त्यापैकी राजेंद्र पवार यांचे रोहित पवार हे पुत्र आहेत. रोहित पवार यांनी कुंती पवार यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.

Story img Loader