महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोच्या जागेवर छापा टाकला. महाराष्ट्र विधानसभेतील कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (३८) हे बारामती अॅग्रोचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.
मनी लाँड्रिंग कारवाई मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (EOW) शाखेच्या ऑगस्ट २०१९ च्या FIR वर आधारित आहे. त्याच वर्षी २२ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सहकारी क्षेत्रातील साखर कारखानदारांच्या कथित फसव्या पद्धतींद्वारे विक्री केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. साखर कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री केली, असे न्यायालयाने आपल्या टिपणीत म्हटले होते. यातील एक साखर कारखाना रोहित पवार यांनीही घेतला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेने एफआयआर नोंदवला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा