सक्तवसुली संचलनालयाने (ED) गुरुवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी पश्चिम बंगालचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते रथीन घोष यांच्या संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर धाड टाकली. पश्चिम बंगालमधील महानगरपालिकेतील नोकर भरती घोटाळ्यामध्ये रथीन घोष यांचे नाव घेण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणेने २४ परगणा आणि कोलकातामधील काही ठिकाणीही छापेमारी केली असल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. अनेक महानगरापालिकांमध्ये नियमांचे उल्लंघन करून आणि पैशांच्या बदल्यात नोकर भरती घोटाळा झाला असल्याची माहिती बाहेर आल्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत सदर कारवाई केली. ज्या महापालिकेमध्ये घोटाळा झाला, त्या महापालिकेवर २०१४ ते २०१९ या काळात रथीन धोष अध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांची चौकशी होत असल्याची माहिती मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा