नागपूर : पदवीधर, शिक्षक, जिल्हा परिषद निवडणुकांमधील पराभव तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्यानेच नागपूर या पक्षाच्या बालेकिल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसांत चार मतदारसंघांमध्ये पक्षाचे मेळावे घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला आहे.

फडणवीस मागच्या आठवड्यात तीन दिवस नागपूर दौऱ्यावर होते. यापैकी दोन दिवस त्यांनी जिल्ह्यातील चार मतदारसंघांना भेटी दिल्या. त्यापैकी एक राष्ट्रवादीचा (काटोल) व दोन काँग्रेसचे (सावनेर, उमरेड) आणि एक (हिंगणा) भाजपच्या ताब्यात आहे. २०२४ च्या लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘शतप्रतिशत भाजप’ हे धोरण पक्षाचे आहे, त्याच अनुषंगाने फडणवीस यांनी आत्तापासून पावले टाकणे सुरू केले आहे.

Assembly Election 2024 Waiting for four hours to see Priyanka Gandhi By the citizens of Nagpur news
प्रियंका गांधींना फक्त बघता यावे यासाठी तब्बल चार तासाची प्रतीक्षा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा – साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरात प्रथमच आमने-सामने

२०१४ मध्ये मुख्यमंत्री असताना फडणवीस स्वत:चा मतदारसंघ (दक्षिण-पश्चिम नागपूर) वगळता शहराच्या राजकारणात विशेष लक्ष घालत नव्हते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कलानेच राजकारण चालायचे. ग्रामीण भागाची जबाबदारी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांभाळून होते. मात्र कालांतराने चित्र बदलत गेले. २०१९ मध्ये खुद्द बावनकुळेंनाच उमेदवारी नाकारण्यात आली. गडकरींच्या शहरातील राजकीय सहभागावरही मर्यादा आल्या. त्यामुळे गडकरींना मानणारा मोठा वर्ग फडणवीसांकडे वळला. सत्ताबदलानंतर आता फडणवीस यांनी शहरासोबतच ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे. त्यांचा हा जिल्हा दौरा त्यामुळेच महत्त्वाचा मानला जातो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वीच या दौऱ्याची आखणी झाली होती. तो संपूर्णपणे राजकीय असेल असेही ठरले होते. मात्र तो तसा वाटू नये म्हणून तालुक्याच्या ठिकाणी आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले. मात्र फडणवीस यांनी या दौऱ्याचा व निवडणुकीच्या तयारीचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून केंद्र व राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचते किंवा नाही हे पाहणे माझे काम आहे, असे त्यांनी माध्यमांपुढे सांगितले. पण बैठकीनंतर झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी केलेली भाषणे ही राजकीय स्वरुपाचीच होती. उमरेडमध्ये त्यांनी बुथ बळकटीकरणावर भर दिला तर सावनेरमध्ये त्यांनी बाहेरून उमेदवार लादणार नाही, हे कार्यकर्त्यांना सांगितले. या दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामीणमध्ये पक्ष पातळीवर काय चालू आहे, विरोधी पक्षाचा आमदार असलेल्या मतदारसंघात पक्षाची स्थिती कशी आहे, सक्षम उमेदवाराचा शोध व नसेल तर बाहेरून आयात करण्यासाठी प्रयत्न या सर्व बाबींची चाचपणी त्यांनी या दौऱ्यात केली.

हेही वाचा – कर्नाटकच्या पराभवानंतर मध्य प्रदेश भाजपामध्ये चिंतेचे वातावरण; अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान कायम

सावनेरमध्ये स्थानिक उमेदावरच देऊ असे सांगणारे फडणवीस दुसऱ्याच दिवशी काँग्रेसमधून निलंबित व सावनेरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक डॉ. आशीष देशमुख यांच्या घरी अल्पोपाहारास गेले. यातूनच त्यांच्या सावनेर दौऱ्याचा उद्देश स्पष्ट झाला. अशाच प्रकारचा शोध त्यांनी उमरेडमध्येही सुरू केला. तेथील मेळाव्यात त्याच अनुषंगाने काही पक्ष प्रवेश झाले. एकूणच फडणवीस यांना नागपूर शहरासोबतच ग्रामीणमध्येही एकहाती वर्चस्व निर्माण करायचे आहे हे यातून स्पष्ट होते.

जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सहा आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. विधानसभेच्या सहापैकी दोन काँग्रेस, दोन भाजप व प्रत्येकी एक राष्ट्रवादी व शिंदे गटाकडे आहे. लोकसभेची नागपूरची जागा भाजपकडे तर रामटेकची सेनेच्या शिंदेगटाकडे आहे. पुढच्या काळात त्यांचा विधानसभेच्या सहाही जागा भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्याचा प्रयत्न असेल, त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.