नाशिक : भाजपमध्ये प्रवेशाची आपली इच्छा असतानाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अजून काही दिवस वाट पाहून नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातच सक्रिय होणार, असा मनोदय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते खडसे यांनी राष्ट्रवादीला राजीनामा देत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवले होते. परंतु, खडसे यांचा राजीनामा शरद पवार गटाने अद्याप मंजूर केलेला नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा त्यांनी केली होती. नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही त्यांनी भेट घेतली होती. परंतु, अद्यापही खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या फलकांवर शरद पवार यांचेही छायाचित्र आहे. या पार्श्वभूमीवर, खडसे यांनी माध्यमांशी पुढील राजकारणाविषयी भाष्य केले.

हेही वाचा >>>नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक

भाजपमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात आपण विनंती केली होती. आपल्या काही अडचणी होत्या. त्याविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती दिली होती. शरद पवार यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊ नका, असे सांगितले होते. त्यामुळेच आपण अजूनही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहोत. भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहून नंतर शरद पवार गटात कार्यरत होऊ, असे खडसे यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse is waiting for response from bjp print politics news amy