जळगाव जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना सर्वाधिक मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या निकालातून सामाजिक गणितेही प्रभावी ठरली आहेत. भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात संघ गेला असला तरी त्यातही निम्मे उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे या निकालाकडे पक्षीयदृष्ट्या पाहिल्यास फसगत होण्याचीच शक्यता अधिक. असे असले तरी शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे या विजयाचा राजकीय लाभ उठविण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.

हेही वाचा- केतन नाईक : कामगार चळवळीतील नेतृत्व

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर

सुमारे ५०० कोटींची उलाढाल असणार्‍या दूध संघाची मागील निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. तिची पंचवार्षिक मुदत ऑगस्ट २०२० मध्ये संपली होती. करोनामुळे मुदतवाढ मिळाल्यानंतर यंदा ही निवडणूक झाली. भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागा ताब्यात घेऊन खडसे यांच्या सहकार पॅनलचा धुव्वा उडविला.

२०१५ मध्ये आमदार खडसे हे भाजपमध्ये होते, त्यावेळी त्यांनी सर्वपक्षीय पॅनलचा प्रस्ताव सादर करीत दूध संघात वर्चस्व मिळवीत, कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या रूपाने जिल्हा बँकही ताब्यात घेतली होती. भोसरी खुल्या भूखंड प्रकरणात आरोप झाल्यानंतर खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर खडसेंनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परिणामी जिल्ह्यातील सत्तासमीकरणेही बदलली. त्यानंतर राज्यातील सत्तांतरनाट्य घडल्याने जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे या राजकीय शत्रुत्वास अधिकच धार चढली.

हेही वाचा- “गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने ‘खेळ’ बिघडवला”; काँग्रेसच्या पराजयावर पी चिदंबरम यांचं विधान

राज्यात सत्तांतरनाट्यानंतर दूध संघात शासनाच्या आदेशाने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. शासनाने प्रशासकप्रमुख म्हणून भाजपचे चाळीसगावचे आमदार चव्हाण यांची नियुक्ती केली होती. त्यांनी प्रशासकपदाच्या ३२ दिवसांत दूध संघातील सात वर्षांतील मंदाकिनी खडसे यांच्या कार्यकाळातील नोकरभरतीसह गैरकारभार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आणली. या प्रकरणात खडसेंचे निकटवर्तीय असलेल्या कार्यकारी संचालकांसह चार अधिकार्‍यांना अटकही झाली. हा खडसेंसाठी पहिला धक्का होता. दूध उत्पादकांनी शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने कौल देत खडसेंवरील नाराजी व्यक्त केली. थेट खडसेंना आव्हान देत पराभव करण्याची क्षमता पहिल्यांदाच आमदार चव्हाणांनी दाखविली आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत चव्हाण यांचे वजन नक्कीच वाढणार आहे. त्यांच्या विजयात दोन्ही मंत्र्यांचे मोठे योगदान आहेच. दोन्ही मंत्र्यांचे चातुर्य, सत्तेचा प्रभाव शेतकरी विकास पॅनलच्या कामी आला.

आजपर्यंत सहकार क्षेत्रात प्रवेश न केलेले मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघात जळगाव मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवीत दिमाखदार प्रवेश केला. दूध संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांसह मंदाकिनी खडसे यांना निवडून आणणे, हेच खडसेंसमोर मोठे आव्हान होते. खडसेंच्या विरोधात दोन मंत्री, पाच आमदार आणि दोन खासदार असे दिग्गज होते. शिवाय, त्यांच्या पाठीशी सत्ताही होती. निवडणुकीत पैशांचा महापूर वाहणार, असा आरोप खडसेंनी केला आणि तसे झाल्याचीही चर्चा आहे. दोन्ही बाजूंनी खोक्यांचा वापर झाल्याचे चर्चितचर्वण चांगलेच रंगले. आमदार चव्हाणांपेक्षा मंदाकिनी खडसेंना ७६ मते कमी मिळाली. भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्यांतली म्हणजे खडसेंच्या बालेकिल्ल्यातील १६ मते चव्हाणांना मिळाली आहेत. रावेर, यावल, फैजपूर हा परिसर खडसेंच्या प्रभावाचा मानला जातो. तिथे तर चव्हाणांपेक्षा खडसेंना सात मते कमी मिळाली आहेत. आपल्या बालेकिल्ल्यातच हे धक्के खडसेंसाठी धक्का देणारे ठरले आहेत. दूध संघाच्या निवडणुकीत अवघ्या ४४१ जणांचे मतदान होते. आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जाणार असल्याने जनतेचा खरा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे तेव्हांच कळू शकेल.

हेही वाचा-घराणेशाहीच्या राजकारणापासून काँग्रेसची फारकत; हिमाचल प्रदेशात नवा पायंडा

शिंदे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील आणि भाजपचे मंत्री महाजन यांंचा दूध संघात दणदणीत प्रवेश झाला आहे. गेल्या पाच वर्षांत महाजन हे मंत्री असताना जिल्हा बँकेतही संचालक होते. मात्र, त्यांनी संचालक मंडळाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा बँकेत एकदाही पाय ठेवला नव्हता. याउलट मंत्री असताना खडसेंनी दूध संघाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी शंभर कोटींचा निधी खेचून आणला होता. आता शेतकर्‍यांच्या या दूध संघाला राज्यासह देशभरात ‘विकास’चा नावलौकिकासाठी पाटील व महाजन या मंत्रीद्वयींचा कस लागणार आहे.

या निवडणुकीत सभासदांनी उमेदवार कोणत्या पक्षाचा हा विचार केलेला नाही. त्यामुळेच भाजपचे आमदार चव्हाण आपला चाळीसगाव भाग सोडून थेट मुक्ताईनगरातून उभे राहिले. आणि विजयी झाले. गंमत म्हणजे त्यांच्याच चाळीसगाव गटात चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सुभाष पाटील यांचा खडसे यांच्या सहकार पॅनलचे प्रमोद पाटील यांनी दणदणीत पराभव केला. प्रमोद पाटील यांना २४८ मते मिळाली, तर सुभाष पाटील यांना १८८ मते मिळाली. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून, माजी आमदार राजीव देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत. यामुळे एकीकडे आमदार चव्हाण यांचा लौकिक वाढला असताना दुसरीकडे त्यांना त्यांच्याच तालुक्यातच धक्का बसला आहे. त्यामुळे दूध संघातील यशामुळे जनता शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी असल्याचा अर्थ महाजन-पाटील यांनी काढल्यास त्यांच्यासाठी पुढील निवडणुकांमध्ये ते धोकादायक ठरु शकते. या एका निवडणुकीमुळे खडसे यांचे राजकारण संपले नसले तरी त्यांना नेमके चुकते कुठे, हा बोध देणारा हा निकाल निश्चितच आहे.

सहकार क्षेत्रात राजकारण नसते. त्यामुळे माझ्यासाठी राष्ट्रवादीने दरवाजे बंद केलेले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलमधून निवडून आलेले संजय पवार यांची प्रतिक्रिया सर्वात बोलकी आहे.

Story img Loader