संतोष प्रधान

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने करतानाच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर करून फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या प्रतापामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Image Of Bhagwant Mann
Bhagwant Mann : “राज्य पेटलेले असताना मुख्यमंत्री क्रिकेटचा विचार कसा करू शकतात?”, भगवंत मान यांचा ऑस्ट्रेलिया दौरा का ठरतोय टीकेचा विषय?
Allu Arjun vs Revanth Reddy
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी-अल्लू अर्जुनच्या वादात बीआरएस पक्षाला नवसंजीवनी;…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
salman rushdi the satanic verses in india
The Satanic Verses: बंदीच्या चार दशकांनंतर सलमान रश्दींचं ‘दी सटॅनिक व्हर्सेस’ भारतात परतलं; १९८८ मध्ये जारी केले होते आदेश!
Congress
Haryana Congress : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही धडा नाहीच… हरियाणा काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजी संपेना
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बहुतांशी सर्व वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यात मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के लोकांनी तर फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदीपदासाठी कौल दिल्याचा उल्लेख आहे. ही बाब भाजपला फारची झोंबली आहे. दुसऱ्या आकडेवारीत राज्यात भाजपला ३०.२ टक्के तर शिवसेनेला १६.२ टक्के कौल जनतेने दिला आहे. राज्यातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत आणण्यास इच्छूक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा… भाजपमधील निष्ठावंतांनी विखे पिता-पुत्राविरुद्ध थोपटले दंड!

युतीला ४६.४ टक्के कौल असल्याच्या आकडेवारीवर भाजपकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याचाच अर्थ ५३.६ टक्के जनता युती सरकारच्या विरोधात असल्याचा अर्थ होतो. शिवसेनेच्या आकडेवारीवरून राज्यातील निम्मी लोकसंख्याही सरकारवर समाधानी नाही हेच सिद्ध होते, अशी प्रतिक्रििया राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे हे फडण‌वीस यांच्यापेक्षा तीन टक्के मतांनी आघाडीवर असल्याची आकडेवारी ही फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखीच आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यावर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे फडणवीस यांचे स्वप्न भंग पावले. त्यानंतर नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. शिंदे यांच्या हाताखाली काम करावे लागत असतानाच आता पुन्हा शिंदे यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी वातावरण निर्मिती सुरू करणे हे फडणवीस यांच्यासाठी धक्कादायकच आहे.

हेही वाचा… ‘ओबीसी’वरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये कमालाची कटुता निर्माण झाली आहे. शिंदे गटातील पाच मंत्र्यांना आवरा किंवा डच्चू द्या, अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. शहा आणि शिंदे व फडणवीस यांच्या भेटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी पाच मंत्र्यांबद्दलची माहिती उघड केली होती. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी पेरण्यामागे फडणवीस यांचा हात असल्याचा शिंदे गटाचा संशय आहे. याशिवाय ठाणे आणि कल्याण या शिंदे यांच्या बालेकिल्ल्यांतील दोन लोकसभेच्या जागांवर भाजपने दावा केला हे शिंदे यांना पसंत पडलेले नाही. यातूनच शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना राजीनाम्याची भाषा करावी लागली. या साऱ्याचा परिपाक म्हणजे आज शिंदे गटाने प्रसिद्द केलेली जाहीरात असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा… नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार की बदलणार ?

राज्यातील जनता भाजप-शिवसेना सरकारवर समाधानी आहे हेच सर्वेक्षणातून सिद्ध होते. गेल्या ११ महिन्यांत सरकारे लोकपयोगी अनेक निर्णय घेतले. त्यामुळे राज्यातील जनतेची पसंती पुन्हा युती सरकारलाच मिळेल. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हातात हात घालून सरकारचा काभार करीत आहेत. पुन्हा युतीच सत्तेत येईल. – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहे. मी की तू मोठा ही स्पर्धा सुरू आहे. – क्लाईड क्रास्टो , प्र‌वक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

Story img Loader