Vijay Nahata: विजय नहाटांच्या बंडखोरीमुळे शिंदे गट अवाक

Maharashtra Assembly Election 2024 संदीप नाईक यांच्या बंडखोरीनंतर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकजूटीने भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांना साथ देण्याची भूमीका घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विजय नहाटा यांच्या बंडखोरीमुळे गुरुवारी फुट पडली.

Vijay Nahata in Shinde Group Shivsena Maharashtra Assembly Election 2024
विजय नाहाटा यांचे बंड एकनाथ शिंदे शिवसेना

Vijay Nahata in Shinde Group Shivsena संदीप नाईक यांच्या बंडखोरीनंतर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकजूटीने भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांना साथ देण्याची भूमीका घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विजय नहाटा यांच्या बंडखोरीमुळे गुरुवारी फुट पडली. नहाटा यांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले असून हे बंड खपवून घेतले जाणार नाही या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त करताच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नहाटा यांना पाठींबा नसल्याचे जाहीर केले. नहाटा यांच्या बंडखोरीशी आमचा संबंध नाही असे पत्रकच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काढत त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकावित गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी यापूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही जागा भाजपला सुटणार याची कल्पना येताच शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते विजय नहाटा यांनी बंडाची भाषा सुरु केली होती. आपण पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र नाईकांच्या बंडासाठी थांबलेले पवार यांनी अखेरपर्यंत नहाटा यांना रांगेत ठेवले. संदीप यांनी तुतारी हाती घेताच शिंदे समर्थक असलेले स्थानिक नेते सावध झाले आणि बुधवारी वाशीतील भावे नाट्यगृहात पक्षाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात एकदिलाने भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांचे काम करु अशी भूमीका जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर याच्यासह प्रमुख नेत्यांनी मांडली. यावेळी उपस्थित असलेले विजय नहाटा यांनीही गणेश नाईक यांच्यावर टिकेची तोफ डागली. या मेळाव्यास उपस्थितीमुळे नहाटा यांची ‘घर वापसी’ झाली असे चित्र एकीकडे निर्माण झाले असताना गुरुवारी सकाळी त्यांनी बेलापूरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे शिंदे गटाचे नेतेही आवाक झाले आहेत.

case against ravindra dhangekar hindmata pratishthan
रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध गुन्हा; दिवाळीनिमित्त नागरिकांना साबण, उटणे वाटप
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
shrikant pangarkar
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश; ‘या’ पदावर केली नियुक्ती!
Raj thackeray Mamledar misal, Raj thackeray Thane,
राज यांच्या ‘चवदार’ भेटीत कार्यकर्त्यांची मने मात्र कडू !
Shivsena Pune, Shivsena presence in Pune,
आव्वाज कुणाचा?
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
Imtiaz Jaleel, case against Imtiaz Jaleel, Pune,
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा – पूर्व नागपूरमध्ये युती-आघाडीत नबंडाचे वारे

हेही वाचा – अजित पवारांच्या नाराज आमदाराची प्रथम काँग्रेसकडे धाव, नंतर प्रहारमध्ये प्रवेश, महायुतीमध्ये बंडाचा झेंडा

मुख्यमंत्र्यांकडून तंबी ? नेते सावध

बुधवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी भावे नाट्यगृहात येणारे विजय नहाटा यांनी गुरुवारी सकाळी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे समजते. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही या प्रकरणी स्थानिक नेत्यांकडे नाराजी व्यक्त करताच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दुपारी पत्र काढून नहाटा यांच्या भूमिकेला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. ‘नहाटा यांच्या बंडाशी आमचा काहीएक संबंध नाही. बुधवारी आयोजित केलेली सभा ही मंदा म्हात्रे यांना पाठींबा देण्यासाठी होती. नहाटा यांच्या बंडास आमची सहमती नाही’ अशी भूमिका शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी घेतली आहे. नहाटा यांच्यासोबत कुणीही जाऊ नये आणि मंदा म्हात्रे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही पत्राद्वारे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde faction is speechless due to vijay nahata rebellion ssb

First published on: 24-10-2024 at 19:09 IST

संबंधित बातम्या