उमाकांत देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : भाजपचे मुरजी पटेल हेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह व नाव गोठविण्यासाठी शिंदे गटाकडून ही निवडणूक लढविण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेला अर्ज हा केवळ भाजपच्या राजकीय खेळीचा भाग होता, असे सूत्रांनी सांगितले. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी शिवसेना कार्यकर्ते आणि काही प्रमाणात जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा… अमित शहा यांच्या आगामी दौऱ्यात पश्चिम महाराष्ट्रात राजकीय फेरबांधणी, भाजपची पकड घट्ट करण्याकडे लक्ष
शिंदे गटाला ‘ बाळासाहेबांची शिवसेना ’ हे नाव निवडणूक आयोगाकडून मंजूर करण्यात आले असून निवडणूक चिन्हही लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मात्र तरीही शिंदे गटाकडे सुयोग्य उमेदवार नसल्याने आणि भाजपने आधीपासूनच मुरजी पटेल यांना संकेत देऊन निवडणुकीची तयारी करण्यास सांगितल्याने आता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश लटके यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी स्नेहसंबंध होते. त्यामुळे ही निवडणूक लढवू नये, अशी शिंदे गटातील काही नेत्यांची भूमिका होती.
शिवसेना फुटीनंतर ही पोट निवडणूक होत असून उध्दव ठाकरे यांचा पराभव करण्याचा भाजपने चंग बांधला आहे. शिंदे यांना ही जागा दिल्यास त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही व निवडणूक ताकदीने लढली जाणार नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीत चांगली मते मिळविलेल्या मुरजी पटेल यांनाच उमेदवारी दिली जाईल. भाजपने त्यांना तयारीच्या सूचना आधीच दिल्या असून मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी भाजपच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटनही दोन ऑक्टोबर रोजी केले आणि युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले आहे. शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली. तेव्हा ही पोटनिवडणूक व मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह अन्य राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाली. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या उमेदवारीची लवकरच भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडून अधिकृत घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
ही जागा भाजपच लढणार, हे आधीपासूनच ठरले असताना शिवसेनेला दणका देण्यासाठी धनुष्यबाण चिन्ह काढून घेण्यासाठी आयोगाकडे शिंदे यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला व हे चिन्ह गोठविले गेले. शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाले असते, तर कदाचित वेगळा विचार करता आला असता. पण आता शिंदे यांना नवीन चिन्ह मिळणार आहे व त्यांच्या पक्षाची या मतदारसंघात काहीही ताकद नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांच्या पक्षाचे नवीन नाव व निवडणूक चिन्ह मिळणे आवश्यक होते. त्यावेळी शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठविले गेले असते, तर शिंदे व भाजपविरोधात रोषाचा परिणाम निवडणुकीतून दिसून आला असता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस अजून काही महिन्यांचा अवधी आहे. तसेच भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती असल्याने आता भित्तीफलक, जाहिरात फलकांवर शिंदे यांच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह प्रदर्शित केले जाईल. शिंदे यांच्या पक्षाचा उमेदवार असणे गरजेचे नाही, असे भाजपमधील सूत्रांनी नमूद केले.