मुंबई : निकालाच्या १० दिवसांनंतर भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची उद्या, बुधवारी निवड होत असतानाच त्याच्या तोंडावर महायुतीत धुसफूस समोर आली आहे. ‘शपथविधीबाबत आम्हाला बावनकुळे यांच्या ट्वीटवरून समजले’, ‘शपथविधीसाठी बोलावले तर जाऊ’ वा ‘एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार नाहीत’ अशी विधाने शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली. विजयी होण्याचे प्रमाण (स्ट्राईक रेट) भाजपनंतर आमचा असल्याने सत्तेत राष्ट्रवादीला यानुसार वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत छगन भुजबळ यांनी मात्र शिवसेनेला चिमटा काढला आहे.

हेही वाचा >>> कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच

Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
police arrested the dumper owner in the wagholi accident case
पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर

भाजप विधिमंडळ पक्षाची नवा नेता निवडीसाठी उद्या सकाळी विधानभवनात बैठक होत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले होते. सत्तेत शिंदे यांना मनासारखा वाटा मिळणार नसल्यानेच बहुधा शिंदे गटाचे नेते बिथरले असावेत, असे बोलले जाते. शिवसेनेचे (शिंदे) नेते भाजपला लक्ष्य करीत असताना छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली. शपथविधी सोहळ्याची तयारी बघण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. ‘शपथविधी समारंभाचे आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्वीटवरून समजले’, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी विधान करीत शिवसेनेला विश्वासात न घेतल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. ‘भाजप हा मोठा भाऊ आहे. शपथविधीसाठी आम्हाला बोलावले तर जाऊ’, असे वक्तव्य शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले. सामंत आणि केसरकर यांचा एकूणच सूर हा भाजपच्या विरोधी होता. भाजपकडून परस्पर आणि एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याची भावना या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.

शिरसाट यांचे प्रत्युत्तर

● शिंदे यांच्या आजारपणावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी, ‘एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी लाचार नाहीत. त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही. सत्तेसाठी सोंग ढोंग करणे त्यांच्यासाठी गरजेचे नाही’, असे प्रतिपादन केले. शिंदे यांच्या राजकीय आजारावरून भाजपच्या गोटातून सुरू झालेल्या कुजबुज मोहिमेला शिरसाट यांनी तेवढेच सडेतोड उत्तर दिले.

● महायुतीत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले असताना भाजपकडून मवाळ भूमिका स्वीकारण्यात आली होती. पण राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. भुजबळ म्हणाले, विजयी होण्याच्या प्रमाणाचा विचार केल्यास भाजपनंतर आम्हाला यश मिळाले आहे. यामुळे सत्तावाटपात आम्हालाही योग्य वाटा हवा आहे. भुजबळ यांनी एक प्रकारे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे यश अधिक असल्याचा दावा केला.

Story img Loader