नेहमीच वादग्रस्त विधान करणारे ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संभाजी भिडे यांनी बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका महिला पत्रकाराला कपाळाला टिकली न लावल्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. तू आधी टिकली लाव मग तुझ्या प्रश्नाला उत्तर देतो, असं विधान भिडेंनी केलं. यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं. या प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे भिडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजी भिडे हे महाराष्ट्रातील उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय वर्तुळातील एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आपली हिंदुत्वाची ओळख जपण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना उभी करण्यासाठी संभाजी भिडे यांच्यासोबतचे संबंध फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांचं राजकारण मुख्यमंत्र्यांच्या राजकीय विचारसरशी मिळतं-जुळतं आहे, असं स्वतःला चित्रित करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून केला जात आहे.

हेही वाचा- पालकमंत्री गिरीश महाजनांचे अमित देशमुख यांच्याकडून कौतुक; वादळ थांबविणारे नेतृत्व म्हणत सूर जुळवून घेण्याचा प्रयत्न

खरं तर, मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. दरम्यान, ते दहीहंडी, गणेशोत्सव आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या उत्सवांना आक्रमकपणे प्रोत्साहन देत आहेत. विशेष म्हणजे राज्यकारभारावर त्यांचं पुरेसं लक्ष नसल्याचा आरोप केल्यानंतरही ते मागे हटले नाहीत. आपली हिंदुत्वाची प्रतिमा सर्वदूर पोहचवण्यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांनी बुधवारी संभाजी भिडे यांची भेटही घेतली आहे. यामागे एकनाथ शिंदे यांचं दीर्घकालीन राजकीय गणित आहे.

हेही वाचा- “मी दहशतवादी आहे का?” ५०० पोलिसांनी गराडा घातल्याचं सांगत सुषमा अंधारेंचा संताप

बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर संभाजी भिडे यांनी भेटीबाबतचा तपशील देण्यास नकार दिला. परंतु नवीन सरकारच्या कारभाराचं कौतुक केलं. “मला अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना भेटण्याची इच्छा होती. आज आमची भेट झाली. येथून पुढेही त्यांना भेटत राहीन,” अशी प्रतिक्रिया भिडेंनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde meeting with sambhaji bhide controversy for not applying bindi rmm