No Seat For Shiv Sena Eknath Shinde In Delhi Election From NDA : सध्या राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात एकीकडे इंडिया आघाडीची घडी विस्कटलेली असताना, भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमधील एनडीएचे मित्रपक्ष, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना दोन जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी भाजपाचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेला (एकनाथ शिंदे) एकही जागा मिळालेली नाही. दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वबळावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजापने ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कालपर्यंत ७० पैकी ६८ जागा जाहीर केल्या होत्या. आता त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पार्टीसाठी प्रत्येकी एक जागा सोडली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दल बुरारीची तर लोक जनशक्ती (रामविलास) देवलीची जागा लढवणार आहे.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
भाजपाला दिल्ली दूरच... आपने दशकभर वर्चस्व कसं राखलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?
Pyari Didi Yojana
Delhi Elections : भाजपा-सेनेच्या ‘लाडकी बहिण’च्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसची दिल्लीत ‘प्यारी बहन’ला साद

एनडीएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) त्यांच्या अधिकृत चिन्हावर दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

एकनाथ शिंदेंना एकही जागा नाही, अजित पवार स्वबळावर

दरम्यान भाजपाचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेलाही (एकनाथ शिंदे) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक जागा हवी होती. याबाबत त्यांची भाजपाशी चर्चाही झाली होती, पण शिवसेनेला दिल्लीत एनडीएमध्ये एकही जागा मिळू शकलेली नाही. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपाचा महाराष्ट्रातील आणखी एक मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) मात्र, या निवडणुकीत स्वबळावर आपले ११ उमेदवार उभे केले आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीवरही भाजपाचे लक्ष

भाजपाने जागा सोडण्याची घोषणा केल्यानंतर संयुक्त जनता दलाने बुरारी विधानसभा मतदारसंघातून शैलेंद्र कुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) देवली येथून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. याबाबत बोलताना संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, “प्रामुख्याने, आम्ही सर्वांनी मिळून आम आदमी पार्टीला पराभूत करण्याचे ठरवले आहे. आता जागावाटप निश्चित झाले आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहोत.”

दरम्यान या वर्षाच्या शेवटी बिहारमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत बिहारमधील मित्रपक्षांना जागा सोडण्यास नकार दिला नाही.

एनडीएतील घटक पक्षांचे एकमेकांना आव्हान

२०२० मध्येही नितीष कुमार यांचा संयुक्त जनता पक्ष एनडीएचा भाग होता. त्यावेळी भाजपाने त्यांना दिल्लीत दोनच जागा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांना कमी लेखण्यात आले का असे विचारता, राजीव रंजन प्रसाद म्हणाले, “आम्ही किती जागा लढवत आहे हे महत्त्वाचे नाही. आम्ही एकत्र लढून दिल्लीतील लोकांना चांगल्या प्रशासन देणे महत्त्वाचे आहे.”

गेल्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने बुरारी मतदारसंघासह पूर्वांचलींचे वर्चस्व असलेल्या संगम विहार मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. असे असले तरी संयुक्त जनता दलासमोर यंदा एनडीएचा घटन पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक दलाचेही आव्हान असणार आहे. दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीने गेल्या निवडणुकीत किरारी, बिजवासन, लक्ष्मी नगर, सीमापुरी आणि मुस्तफाबाद येथून उमेदवार उभे केले होते.

Story img Loader