ठाणे : श्रीनगर भागातील काँग्रेसचे प्रभावी नेते मनोज शिंदे यांना पक्षात आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी या आपल्या विधानसभा मतदार क्षेत्र विरोधकमुक्त करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे. नारायण राणे यांचे एकेकाळचे कडवे समर्थक रविंद्र फाटक यांना काही वर्षांपूर्वी शिंदेंनी असेच स्वपक्षात घेतले आणि मतदारसंघातील कडवा विरोधक ‘संपवला’. या मतदारसंघात भाजपची ताकदही वाढू लागली होती. उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा वाढता प्रभावही रोखला. आता काँग्रेस नेते मनोज शिंदे यांना पक्षात आणून संपूर्ण मतदारसंघावर त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा सुरुवातीपासून बालेकिल्ला असला तरी काँग्रेस विचारांना मानणारा एक मोठा वर्ग येथे होता. जुन्या ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये तयार झालेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे हे आमदार झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहणारे मनोज शिंदे यांनी ४० हजार ७२६ (२५.१३ टक्के) इतकी मते घेतली. २०१४ या मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले. यावेळी भाजपमधून उभे राहिलेले संदिप लेले यांनी ४८ हजार ४४७ (२६.२४ टक्के) इतकी मते घेतली. लेले यांना मिळालेली मते अनेकांना अचंबित करणारी होती. याच काळात मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील विरोधक एक-एक करून पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. वागळे इस्टेटमधील रघुनाथ नगर, रहेजा या सारख्या भागात प्राबल्य राखून असणारे नारायण राणे समर्थक रविंद्र फाटक यांना त्यांनी पालकमंत्री होताच पक्षात घेतले. फाटक हे या भागातील पाच ते सहा प्रभागांवर वर्चस्व राखणारे नेते समजले जातात. त्यांना विधान परिषद बहाल करून शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातला मोठ्या विरोधकाचे पंख कापले. लेले यांना मिळालेली मते पाहून भाजपचा प्रभाव आपल्या मतदारसंघात फार राहणार नाही याची पद्धतशीरपणे त्यांनी काळजी घेतली. २०१४ ते २०१९ त्यांनी भाजपशी जुळवून घेतले. २०२२ नंतर त्यांनी या पक्षाशी घरोबाच मांडला. तत्पुर्वी २०१९ साली झालेल्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांना त्यांनी ९० हजार मतांच्या फरकाने आसमान दाखविले. वागळे इस्टेटमधील ठराविक प्रभागांमधून निवडून येणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांची त्यांनी डाळ शिजून दिली नाही.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?

हेही वाचा – नाना पटोलेंच्या भ्रमाचा भोपळा फुटला; साकोलीत लाजिरवाणा विजय!

श्रीनगर भागातील मनोज शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय हे एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक मानले जात होते. २०१७ साली पॅनल पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमधील चारही जागांवर मनोज शिंदे, त्यांचे बंधू शैलेश शिंदे आणि इतर दोन काँग्रेस उमेदवारांचा पाडाव केला. श्रीनगर आणि आसपासच्या पट्ट्यात असलेला खेड, चिपळून, रत्नागिरी पट्ट्यातील कोकणी मतदार हा मनोज शिंदे यांची ताकद मानली जात असे. आपल्या पक्षातील स्थानिक कोकणी नेत्यांना ताकद देत एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांचा गड काबीज केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना कोपरी-पाचपाखाडीत कोणताही प्रबळ विरोधक राहिलेला नाही. यावेळेस त्यांच्याविरोधात कोणाला उभे करावे, असा प्रश्न ठाकरे गटासमोर होता. आनंद दिघे यांचे पुतणे म्हणून केदार यांना रिंगणात उतरविण्यात आले. त्यांचाही शिंदे यांनी इतक्या मतांच्या फरकाने धुव्वा उडवला. विशेष म्हणजे जिंकून आल्यावर दुसऱ्याच दिवशी मनोज शिंदे यांना पक्षात घेत आपल्याच एका कडव्या विरोधकाला त्यांनी ‘शांत’ केले आहे.

हेही वाचा – देवतळे कुटुंबाची धानोरकर कुटुंबावर मात; ७० वर्षांनंतर वरोऱ्यात कमळ फुलले

काँग्रेस पक्षातील अनेक कर्तुत्वान नेते सोडून गेले. यानंतरही आम्ही पक्षाचे काम करित राहिलो. परंतु कोकण पट्ट्याकडे पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. भिवंडी पश्चिमेत काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात मित्र पक्षांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. परंतु पक्षाने मात्र माझ्यावर पहिली कारवाई केली. यासंबंधीचे पत्र पक्षाच्या नेत्यांना पाठविले पण, त्याचीही दखल नेत्यांनी घेतली नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात अनेक विकासकामे केली. अशा कर्तुत्वान मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देणे गरजेचे असल्यामुळे मी त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया मनोज शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.

Story img Loader