Eknath Shinde Resignation from Maharashtra CM : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी सोमवारी मध्यरात्रीपासून एकूणच सूर बदल्याचे चित्र आहे. भाजपने स्पष्ट संदेश दिल्याने शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला. तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली.

निकालानंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचे राजकारण सुरू झाले होते. महायुतीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याने किमान दोन ते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, अशी शिंदे यांची भूमिका होती. शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघडपणे मागणी करण्यात येत होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी फेरवनिवड करावी, असा आमदारांचा सूर होता. सोमवारी दिवसभर शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. लाडक्या बहिणी, आरोग्य सेवा, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींना पुढे करून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. राज्यभर विविध मंदिरांमध्ये महाआरती, पूजाअर्चा करण्यात आली. शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे हे राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती. त्यासाठी ठाणे, मुंबईत विभागप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना वर्षा निवासस्थानी जमण्याचे आदेश देण्यात आले.

Ramdas Athawale on Eknath Shinde
Who is Chief Minister of Maharashtra Live: “फडणवीस चार पावलं मागे आले होते, शिंदेंनी दोन पावलं तरी…”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde Social Media Post viral
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…
Jitendra Awhad on EVM
Jitendra Awhad on EVM: “मतदान झालं ३१२, मतमोजणीत निघाले ६२४”, जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी
Karuna Munde allegation on Dhananjay Munde Assembly Election
Karuna Munde: धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांना मिळाली ‘एवढी’ मते
jitendra awhad on maharashtra assembly election results 2024
निकाल फिरल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांनी थेट अमित शाहांचं घेतलं नाव; म्हणाले, “ऐन प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत…”!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – गिरीश महाजन यांच्यासमोर ३० वर्षांत प्रथमच विरोधक ‘एक लाखांचा’ धनी

हेही वाचा – वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य, रिसोडमध्ये महायुतीतील कुरबुरी काँग्रेसच्या पथ्यावर

u

सोमवारी मध्यरात्री बहुधा सूत्रे फिरली असावीत. कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री १२.५३ मिनिटाने एक्स समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांनी वर्षा किंवा अन्य कुठे जमू नये, असे बजावले. तसेच महायुती भक्कम असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा देण्याची औपचारिकता पूर्ण केल्यावर शिवसेनेचे प्र‌वक्ते व मावळते मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सौम्य भूमिका घेतली. प्रत्येक पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना आपलाच मुख्यमंत्री व्हावा हे वाटणे स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व निर्णय घेईल, अशी काहीशी समजूतदारपणाची भूमिका केसरकर यांनी मांडली. गेले दोन दिवस शिवसेनेत जाणवणारा आक्रमकपणा केसरकर यांच्यात आज नव्हता.
पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्यानेच शिंदे व शिवसेनेचा नूर बदलला असणार. शिंदे यांनी माघारीची तयारी केली आहे. स्वत: व सहकाऱ्यांच्या राजकीय भवितव्याबाबत ते भाजपच्या नेतृत्वाकडून आश्वासन मिळवतील हे आता स्पष्ट आहे.