अविनाश कवठेकर

शिवसेनेविरोधातील अंतर्गत संघर्षामध्ये सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देतानाच सत्तेची समीकरणे जुळविलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंडळांना भेटी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दुसरी संपर्क मोहीम राबवली. पावसात भिजत, कार्यकर्त्यांची संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित नऊ मंडळांऐवजी एकूण २५ मंडळांना भेटी दिल्या. शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळांचे सामाजिक आणि राजकीय महत्व लक्षात घेत संपर्क मोहीम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी फलदायी ठरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती, मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्यासह त्वष्टा कासार तरूण अशोक मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यशवंतनगर गणेशोत्सव मंडळाबरोबरच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात नियोजित होते. तसेच अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन ते गणेश दर्शन घेणार होते. मात्र या व्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील २५ मंडळांना भेट दिली. अन्य मंडळांनी विनंती केल्यानंतर त्यांनाही जाणीवपूर्वक भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

हेही वाचा… Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

राज्यात सरकार आल्यानंतर एका कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी शहरातील काही मंदिरांना भेट देताना पुणेकरांशी संवाद साधला होता. पहिल्या दौऱ्यातच त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. या दौऱ्यातही त्यांनी पुन्हा पुणेकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजता संपणारा दौरा सायंकाळी सहा वाजता संपला.

हेही वाचा… काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांचा पाहुणचार साध्या ‘राइस प्लेट’वर!

महापालिका निवडणूक येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतानाच गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपर्क मोहीम राजकीय पक्षांनी हाती घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर त्यात आघाडी घेतल्याचेच या दौऱ्यात दिसून आले. कमी वेळात जास्तीत जास्त मंडळांना भेट देण्याचा उच्चांक एकनाथ शिंदे यांनी केला. विशेष म्हणजे या दौऱ्यात त्यांनी कोणत्याही मंडळाला नाराज केले नाही. कार्यकर्त्यांच्या हातात हात घेऊन तर कधी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून शिंदे यांनी संवाद साधत युवा वर्गाला खेचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केवळ त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या नव्हे तर अन्य विचारांच्या मंडळांनाही भेट दिली.

हेही वाचा… इचलकरंजीत विसर्जन मिरवणुकीत महापालिका निवडणुकीची बांधणी

शहरातील मंडई मंडळावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा दबदबा आहे. या मंड‌ळावर पूर्वी काँग्रेस नेत्यांचा प्रभाव होता. राज्यातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे बहुतांश पदाधिकारी भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहेत. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सार्वजनिक मंडळालाही त्यांनी भेट दिली. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यापासून त्यांचे आणि मोहोळ यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोहोळ यांच्या मंडळाला दिलेली भेटही अनेकांच्या भुवया उंचविणारी ठरली.

मात्र शहरात सहा तास थांबून अनेक मंडळांना भेट देत हाती घेतलेली संपर्क मोहीम एकनाथ शिंदे यांच्यासाठी आगामी निवडणुकीत फलदायी ठरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Story img Loader