हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबरला मतदान घेण्याची आणि ८ डिसेंबरला मतमोजणी करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोंबरला केली होती. मात्र, हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरात विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याची घोषणा न करण्याच्या आयोगाच्या निर्णयावरून वाद उद्भवला होता. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या आजपर्यंतच्या परंपरेला आयोगाने यावेळी छेद दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यातच आता गुजरातमध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुजरातचे मुख्य सचिव यांनी याबाबत एक आदेश काढला आहे. त्यानुसार, विविध श्रेणी आणि सेवांमधील तब्बल ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : “आई, आजीने मला सांगितलं होतं की…” राहुल गांधींची आईसाठी भावनिक पोस्ट, इंदिरा गांधींच्या आठवणींना दिला उजाळा

तसेच, सहा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्यापही बाकी आहेत. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रेमवीर सिंग (गुन्हे, अहमदाबाद शहर), एजी चौहान (वाहतूक, अहमदाबाद शहर), पोलीस उपायुक्त हर्षद पटेल (नियंत्रण कक्ष, अहमदाबाद शहर ), मुकेश पटेल (झोन-चार, अहमदाबाद शहर), भक्ती ठाकर (ट्रॅफिक, अहमदाबाद शहर), पल सोलंकी (गुन्हे, सुरत शहर) यांचा समावेश आहे.

हेही वाचा : ‘भारत जोडो यात्रे’चा कर्नाटकात सकारात्मक परिणाम, दिग्गज नेत्यांचं मनोमिलन; काँग्रेस कात टाकणार?

निवडणूक आयोगाने का घेतला निर्णय?

राज्य किवा केंद्रशासित प्रदेशात अधिकाऱ्यांना निवडणुकीदरम्यान आपल्या ( स्वत:चे शहर अथवा घर असेलल्या ) जिल्ह्यांत नियुक्त करण्यात येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुजरातच्या मुख्य सचिवांना आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन करत मुख्य सचिवांनी ९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission transfers over 900 officers in gujarat ssa
Show comments