पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुुत्र मयूरेश वांजळे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मयूरेश यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली असून, निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महायुती, तसेच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांची स्पर्धा अधिकच वाढणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या जागावाटपामध्ये खडकवासला भाजपच्या वाट्याला आहे. दोन दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पुणे शहरातील आठपैकी कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. पक्षाचे विद्यमान आमदार असलेल्या खडकवासला आणि पुणे कॅण्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा मात्र या यादीत करण्यात आलेली नाही. खडकवासला मतदारसंघात विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नये, यासाठी मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोहीम सुरू केली आहे. यासाठी गेल्या आठवड्यात या नगरसेवकांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटदेखील घेतली होती.
हेही वाचा >>>अजित पवारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न; राजेंद्र शिंगणेंच्या तुल्यबळ उमेदवाराचा शोध
महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे असलेली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला देऊन त्या बदल्यात खडकवासला मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे घेण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ही जागा मिळावी, यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षदेखील आग्रही आहे. याबरोबरच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून अनेक जण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत.
त्यातच आता याच मतदारसंघातील मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश वांजळे यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश सर्व पक्षांतील नेत्यांची मयूरेश यांनी भेट घेतली आहे. मात्र, ते नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठीदेखील सुरू केल्या आहेत. मयूरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे खडकवासल्यातून इच्छुकांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांची दिल्लीदरबारी धाव, मित्रपक्षांना जागा सोडण्यास विरोध
कोण आहेत मयूरेश वांजळे?
मयूरेश वांजळे यांचे वडील आमदार रमेश वांजळे यांची ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळख होती. २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघातून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली. २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले. त्यांची कन्या सायली वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.