मुंबई : विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच घेण्यात येण्याची शक्यता असून गुरुवारी किंवा शुक्रवारी ती होण्याची शक्यता आहे. विधान परिषद सभापतीपदी आपलाच आमदार असावा, असे भाजपचे राजकीय गणित असून त्यादृष्टीने धनगर समाजातील आणि मराठवाड्यातील नेते प्रा. राम शिंदे आणि आमदार प्रवीण दरेकर आदींच्या नावांचा वरिष्ठ नेते विचार करीत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी संपणार आहे आणि पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. विधान परिषद सभापतीपद रामराजे नाईक-निंबाळकर निवृत्त झाल्यापासून सुमारे दोन वर्षे रिक्त आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे कार्यभार असून त्या शिवसेना शिंदे गटाबरोबर आहेत. पण आता सभापतीपदी भाजपच्या नेत्याची निवड व्हावी, असे वरिष्ठ नेत्यांनी ठरविले आहे.

हेही वाचा >>> भाजपाच्या ‘या’ खासदाराने उद्घाटन कार्यक्रमांसाठी मागितले पैसे; खासदारांच्या नोकरी-व्यवसायासंदर्भात काय आहेत नियम?

महायुतीकडे बहुमत

सभागृहात ७८ पैकी २७ जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्यपालनियुक्त १२ आमदारांची नियुक्ती केली जाईल आणि नंतरही महायुतीकडे बहुमत राहील. पण तरीही पुढील काळात काही राजकीय घडामोडी झाल्या, तर भाजपकडे सभापतीपद असलेले चांगले राहील, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यादृष्टीने निवडणुकीची तारीख घोषित करण्याबाबत राज्यपालांना पत्र पाठविले जाणार आहे. पण फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींशी अंतिम चर्चा होऊन निवडणूक या अधिवेशनात घ्यायची की हिवाळी अधिवेशनात हे निश्चित करून उमेदवाराची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of the legislative council speaker of maharashtra held in this session print politics news zws
Show comments