दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : दिवाळीच्या निमित्ताने अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय मोर्चेबांधणी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात सर्व पक्षांनी हात आखडता घेतला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अवधी असल्याने जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये तूर्तास स्पर्धा नाही. तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका अधिकृतपणे जाहीर होत नाही तोवर खर्च करायचा नाही, अशी भूमिका इच्छुक उमेदवारांनी पूर्वानुभवाने घेतली आहे. फार तर शुभेच्छा कार्ड, फराळाचे आयोजन इतपतच दिवाळीचा सणाचा संपर्क कार्यक्रम सीमित आहे.

हेही वाचा : दिवाळीच्या किराणा वाटपावरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये राजकीय फटाकेबाजी

कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी काही सण, उत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी जोरदारपणे संपर्क वाढवायला सुरुवात केली होती. कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मदत संपूनही बरेच दिवस उलटले आहेत. अशीच अवस्था इचलकरंजी महापालिका अन्य नगरपालिका येथेही दिसत आहे. कोल्हापूर महापालिकेसाठी डिसेंबर २०२२ मध्ये प्रभाग रचना, आरक्षण सोडत असा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमही पार पडला होता. त्यानंतर मिळालेली स्थगिती कायम आहे.

आताच खर्च कशाला ?

निवडणूक होणार हे गृहीत धरून इच्छुक उमेदवारांनी वर्षभर आधी म्हणजे २०१९ च्या महापुराचे निमित्त साधून मतदारांना दिवाळी भेट धडाक्यात पुरवली होती. करोना संसर्ग तसेच त्याची तीव्रता कमी झाल्यावर गणेशोत्सव, दहीहंडी अशा उपक्रमांनाही भरभरून रसद पुरवली होती. निवडणुका सातत्याने पुढे जात आहेत. त्या अधिकृतपणे कधी होणार याची शाश्वती कोणीच देत नाही. शिवाय प्रभाग रचना, आरक्षण नेमके कसे असणार याची खात्री नाही. त्यामुळे आताच निवडणुकीच्या निमित्ताने सण -उत्सवावर खर्च कशाला करा, असा सोयीचा विचार इच्छुक उमेदवारांनी केलेला असल्याने या दिवाळीत मतदारांना, जनतेला दिवाळीचा गोडवा म्हणावा तसा चाखता आलेला नाही.

हेही वाचा : कृषी प्रश्नावरून राज्य व केंद्र सरकारला वेढण्याची शिवसेनेची तयारी; दीपावलीच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे अतिवृष्टीच्या पाहणीसाठी शेताच्या बांधावर

मिसळ ते फराळ

जिल्ह्यातील आजी – माजी लोकप्रतिनिधी आदी प्रमुख नेत्यांनी भेट कार्डच्या माध्यमातून मतदारांना शुभेच्छा संदेश देण्यात धन्यता मानली आहे. त्यांचे अस्तित्व अधोरेखित करणारी लोकसभा -विधानसभा निवडणूक इतक्यात होणार नाही. खेरीज, प्रतिस्पर्धी उत्साह दाखवत नसल्याने इतरांनीही हात बांधले आहेत. नाही म्हणायला पुन्हा खासदारकी फिरून आल्याने भाजपचे धनंजय महाडिक यांनी २३ नोव्हेंबरला दिवाळी फराळाचे आयोजन कसबा बावडा उपनगरात केले. महापालिका निवडणुकीची बांधणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांचे निवासस्थान असलेल्या आणि त्यांचा एकहाती प्रभाव असलेल्या या भागातून महाडिक करत आहेत का, याची चर्चा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महाडिक यांनी मिसळ पे चर्चा या नावाने प्रचार मोहीम राबवली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election still far why expenses in diwali festival policy all politicians in kolhapur print politics news tmb 01
Show comments