राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा स्वंयसेवकांसाठी महत्वाचा कार्यक्रम असतो. त्यात सरसंघचालक स्वयंसेवकांना कोणता संदेश देणार यााबत उत्सूकता असते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हा मेळावा होत असल्याने त्याला राजकीय महत्वही होते. त्यामुळे गणवेशध्वारी स्वंयसेवकासोबत विविध क्षेत्रातील मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत करावयाच्या कामाबाबत दिलेल्या स्पष्ट शब्दात संदेशामुळे स्वंयसेवकांमध्ये उत्साह दिसून आला.

सरसंघचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, शंकर महादेवन यांच्या पत्नी संगिता महादेवन, अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होत्या. याशिवाय राजकारण, उद्योग, कला, आयटी क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था अपुरी पडली. अनेकांना सुरेश भट सभागृह आणि लोकांची शाळा मैदानावर वाहने उभी करावी लागली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या पोशाखात कार्यक्रमाला हजर होते. दोघेही एकाच सोफ्यावर बसले व हास्यविनोद करताना दिसून येत होते. स्वयंसेवकांनी पथसंचलन केले.

हेही वाचा… राजकीय स्वार्थासाठी देशात अनिष्ठ शक्तींसोबत आघाडी, सरसंघचालकांची विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका

हेही वाचा… मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांची कसोटी

डॉ. मोहन भागवत यांनी देशाचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा सांगितला. सोबतच वर्तमानात घडणाऱ्या घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. यामुळे स्वयंसेवकांना पुढील निवडणुकीसाठी सज्ज राहण्याबद्दल योग्य तो संदेश पोहचला. भागवत यांनी अतिशय स्पष्टपणे वर्तमान नेतृत्वामुळे देशाचे नाव जगभर अभिमानाने, आदारने घेतले जात असल्याचे सांगितले. तसेच हुळहळू आपल्याला हवे तसे बदल सरकारच्या धोरणात घडत असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडिता व विकास या मुद्यांवर मतदान करावे आणि त्या दिशेने स्वयंसेवक कार्य देखील करतील, असे सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm among rss volunteers due to speech of mohan bhagwat at dussehra rally in nagpur print politics news asj