पंढरपूर : माढा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षात धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतर राजकीय गणिते बदलली आहेत. सातारा जिल्ह्यातील खासदार रणजितसिंह निंबाळकर-जयकुमार गोरे या दोघांच्या विरोधातील नाराज मंडळी एकत्र येऊ लागल्याने भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

भाजपने विद्यमान खासदार रणजिंतसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करताना नाराजी सुरु झाली. या नाराज झालेल्यांची मनधरणी करताना उमेदवाराची आणि भाजपा वरिष्ठांची पुरती दमछाक उडाली. मात्र भाजपातील बंडाला भाजपला विरोध नसून वैयक्तिक विरोध हे एक कारण पुढे येत आहे. तसेच या माध्यमातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी देखील केली जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते – पाटील हे तिघे दहा वर्षांनंतर एकत्र आले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारणावर मोहिते-पाटील यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

हेही वाचा – एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?

माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. माढा लोकसभेवर शरद पवार त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील तर २०१४ साली भाजपाचे रणजितसिंह नाईक निबांळकर निवडून आले. माढा लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मोहिते पाटील हे शरद पवारांची साथ सोडून भाजपात गेले आणि नवखे रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र गेल्या पाच वर्षांत निंबाळकर आणि मोहिते यांच्यात दुरी आली आणि निंबाळकरांना विरोध सुरु झाला. पुढे उमेदवारी जाहीर झाल्यावर देखील मोहिते पाटलांची नाराजी राहिली. ही नाराजी दूर कार्ण्यात्साठी भाजपाने मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले मात्र त्यात यश आले नाही. पुढे धैर्यशील मोहिते पाटलांनी मतदारसंघ पिंजून काढला. तर ही जागा शरद पवार गटाकडे होती. त्यामुळे शरद पवारांनी दूर गेलेले मोहिते पाटील यांना जवळ करण्याचे डाव सुरु केले.

नाराज मोहिते पाटलांनी अखेर तुतारी हाती घेण्याचा निर्णय केला. मात्र भाजपाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपा सोडणार नाही असे त्यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केले. आणि अकलूज येथे धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला. यामध्ये केवळ मोहिते पाटीलच एकटे नारज नव्हते. तर फलटणचे रामराजे निंबाळकर, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माढा येथील संजय कोकाटे, माळशिरसचे उत्तम जानकर यांच्यासह काही मंडळी नाराज होते. हे सारे गणित शरद पवार यांनी जाणून पुन्हा एकदा पक्ष उभारणी आणि जुन्या नेते मंडळीना एकत्र आणण्यात यश मिळवले. तसेच गेल्या काही वर्षात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकत्र काम करून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात एक दबदबा निर्माण केला होता. ते तिघे पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय गणिते बदलू लागली.

हेही वाचा – इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?

अनेक नेते मंडळींना आगामी विधानसभेसाठी तयारी करण्यासाठी आणि महायुतीला पर्याय म्हणून शरद पवार गटाकडे इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे. याचा राजकीय फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची कसोटी लागणार आहे. एकीकडे पक्ष तर दुसरीकडे चुलत भाऊ. त्यामुळे कोणाला झुकते माप देणार हे पहावे लागणार आहे. माढा लोकसभा निवडणूक ही सुरवातील सरळ वाटत होती, मात्र आता निंबाळकर आणि मोहिते पाटील अशी लढत होईल. यात भाजपा आता कोणती रणनीती वापरणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader