महेश सरलष्कर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते येडियुरप्पा, मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा या राष्ट्रीय नेत्यांच्या लोकप्रियतेवर भरवंसा ठेवला होता. मात्र, मतदारांनी त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान

कर्नाटकमध्ये मोदींनी अखेरच्या दहा-बारा दिवसांमध्ये राज्यभर २१ प्रचारसभा आणि ६ रोड शो घेतले होते. अमित शहांनी १६ जाहीरसभा आणि १५ रोड शो घेतले होते. नड्डांनी तर या दोन्ही नेत्यांआधी कर्नाटकमध्ये प्रचार सुरू केला होता. तरीही, प्राथमिक आकडेवारीनुसार, अमित शहांनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या यशाचे प्रमाण केवळ ३५ टक्के असल्याचे दिसते. त्यामुळे कर्नाटकामध्ये झंझावती प्रचाराला तुलनेत कमी यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा-राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे मतांमध्ये परिवर्तन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये ५० किमीचा भव्य रोड शो केला होता, त्याची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये बेंगळुरूमध्ये करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी सलग दोन दिवस मोदींनी अनुक्रमे २६ कमी व ८ किमीचे दोन रोड शो केले. बेंगळुरू शहर व उपनगरांतील मतदारसंघांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले असल्याने शहरी भागांतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदींचे रोड शो घेतल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. २६ किमीचा रोड शो आठ तास चालणार होता पण, लोकांच्या नाराजीमुळे तो दोन टप्प्यांत घेण्यात आला. दुसऱ्या दिवशीचाही रोड शो केवळ आठ किमीपर्यंत करून आटोपता घेण्यात आला.

कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, कल्याण कर्नाटक, कित्तूर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक आणि बेंगळुरू अशा राज्यातील सर्व विभागांमध्ये मोदी-शहांनी तीन-तीन प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा बालेकिल्ला असलेल्या गुलबर्गा जिल्ह्यात जंगी सभा झाल्या होत्या.

कर्नाटकमध्ये सलग दुसऱ्यांदा जिंकणे मोठे आव्हान असल्याचे भाजपचे नेते पहिल्यापासून सांगत होते. भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर, जनता दल (ध)च्या आमदारांना लालूच दाखवून सरकार बनवता येईल असे बोलले जाते. पण, भाजपला शंभरीचा आकडा पार करण्यासाठीही मोदींच्या प्रचाराची गरज असल्याचेही मानले जात होते. अखेरच्या टप्प्यात मोदींच्या प्रचारानंतर भाजपसाठी वातावरण अनुकूल होऊ शकेल अशी आशा भाजपला होती. मोदी-शहांनी हुकुमी एक्का बाहेर काढत काँग्रेसविरोधात प्रचार सुरू केला होता.

आणखी वाचा-जुन्या व स्थानिक निष्ठावंत नेत्यांना डावलल्याचा भाजपला फटका?; महाराष्ट्रासाठीही भाजपला हा सूचक इशारा

मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर परखड टीका करत बजरंगदलाचा मुद्दा हाताशी धरला. खरगेंच्या टिप्पणीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून बदनामी होत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या ८५ टक्के भ्रष्टाचाराचा मुद्दाही प्रचारात आणला. शहा यांनी काँग्रेसकडून दंगली होण्याची भीती दाखवली. मुस्लिमांच्या आरक्षण रद्द करून लिंगायत व वोक्कलिग मतदारांना आकर्षित केले. मात्र, मोदी-शहांच्या प्रचारामध्ये एकही मुद्दा स्थानिक राजकारणीशी निगडीत नव्हता. या दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. पण, काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी सिलिंडरची पूजा करून मोदी-शहांना तगडे प्रत्युत्तर दिले. गॅस सिलिंडरच्या किमती अवाच्या सव्वा वाढत असताना मोदी-शहांनी कोणतीही टिप्पणी केली नाही!

भाजपसाठी मोदींचा चेहरा हा निवडणूक जिंकण्याची खात्री असते. कर्नाटकमध्येही मोदींचा प्रचार भाजपला जिंकून देईल असे नेते- कार्यकर्त्यांना वाटत होते. पण, निकालाने त्यांना निराश केले. त्यामुळे काँग्रेसने पहिल्या प्रतिक्रियेत, कर्नाटकमधील भाजपची हार हा मोदींचा पराभव असल्याची टिप्पणी करून मोदी-शहांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.