पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या सर्व ८० लोकसभा मतदारसंघात भाजपाने एका खासगी संस्थेकडून सर्व्हे केला आहे. मतदारसंघातील वातावरण पाहून त्याप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी हा सर्व्हे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेकडून करण्यात येणारा सर्व्हे पुढील काही महिने सुरूच ठेवला जाणार असून दर तीन महिन्यांनी याचा अहवाल राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाला दिला जाईल. या सर्व्हेतून तीन महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने आपल्या बातमीत नमूद केले आहे. एक म्हणजे भाजपाची मतदारसंघात काय परिस्थिती आहे, दुसरे म्हणजे, मतदारसंघातील लोकांसाठी महत्त्वाचे विषय कोणते आणि विरोधी पक्षांची त्या मतदारसंघातील परिस्थिती, यावर खासगी संस्था लक्ष ठेवून असल्याचे भाजपामधील एका नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा