बुलढाणा : माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक घड्याळ की तुतारी, यापैकी कोणत्या चिन्हावर लढणार, याबाबत अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. त्यांच्या या ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळे विरोधकांसह मित्रपक्षही बुचकळ्यात पडले असून सिंदखेड राजा मतदारसंघात संभ्रमावस्थेचे चित्र आहे.

शिंगणे यांचा या मतदारसंघावरील एकछत्री अंमल गेल्या तीन दशकांपासून कायम आहे. अपक्ष असो किंवा राष्ट्रवादीकडून, विजयश्री त्यांचीच, हा अलिखित नियम झालाय! १९९५ मध्ये ते अपक्ष आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून सलग निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या मुद्यावरून ते लढले नाहीत. २०१९ मध्ये पुन्हा आमदार झाले. मतदारसंघात आताही शिंगणेंचेच वर्चस्व आहे.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

हेही वाचा >>> भाजपचे ११० उमेदवार निश्चित, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय; पहिली यादी उद्या

यंदाची निवडणूकही त्यांच्या भोवतीच केंद्रित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबतच राहतील, असा अंदाज होता. मात्र, जिल्हा बँकेला ३०० कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ या अटीवर ते अजित पवार गोटात गेले. त्यांना वारंवार उमेदवारी आणि मंत्री, पालकमंत्री करून मोठे करणाऱ्या शरद पवारांसह कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का होता.

हेही वाचा >>> आरक्षण उपवर्गीकरण मुद्दा आघाड्यांना भोवणार; ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

सध्या शिंगणे शरीराने अजित पवार आणि मनाने शरद पवारांसोबत, अशा द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसते. कर्ज मिळाल्यावर जिल्हा बँकेतील सोहळा असो, की वर्ध्यातील समारंभ, त्यांनी आपल्या भाषणांतून शरद पवारांचेच कौतुक केले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे शिंगणे शरद पवार गटात परतण्याच्या चर्चेने राजकारण ढवळून निघाले. मध्यंतरी त्यांनी शरद पवारांची भेटही घेतल्याचे वृत्त माध्यमांत उमटले. विशेष म्हणजे, त्यांनी या वृत्ताचे खंडन वा समर्थनही केले नाही. आताही शिंगणे घड्याळ की तुतारी? यावर स्पष्ट बोलायला तयार नाहीत. यामुळे काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट हे विरोधकच काय, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे मित्रपक्षही चक्रावून गेले आहेत. जिल्ह्यातील ७ पैकी ६ मतदारसंघांचे राजकीय चित्र स्पष्ट आहे. मात्र, सिंदखेड राजात राजकीय अस्पष्टता, संभ्रम कायम आहे. 

…पण उमेदवार तेच

अजित पवार गटात राहिले किंवा शरद पवार गटात गेले, तरी तिकीट शिंगणेंनाच, अशी राजकीय स्थिती सध्या सिंदखेड राजामध्ये आहे. त्यामुळे काँग्रेस, ठाकरे गटाचे इच्छुक गोंधळात पडले आहेत. भाजपचे नेते माजी आमदार तोताराम कायंदे, विनोद वाघ हेसुद्धा याला अपवाद नाहीत. शिंगणे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार शशिकांत खेडेकर (शिंदे गट) यांची अवस्थाही अशीच. शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात जाण्याचे त्यांचे मार्ग बंद झालेले. शिंगणेंनी हातावर घड्याळ बांधले तर त्यांना संधी नाहीच, ‘तुतारी’ फुंकली तरच त्यांचा लढण्याचा मार्ग मोकळा, हे स्पष्ट आहे.

काका विरुद्ध पुतणी लढत?

शिगणे यांची उच्चशिक्षित पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवार गटात सामील होत काकांना आव्हान देण्याचे प्रयत्न केले. विकासावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली, आंदोलने केलीत. त्यामुळे काका विरुद्ध पुतणी, अशी लढत होण्याची चिन्हे तयार झाली. मात्र. शिंगणेच्या ‘घरवापसी’च्या चर्चेने याची तीव्रता कमी झाली आहे.

Story img Loader