छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या नेत्यांची छायाचित्रे लाऊन, ढोल वाजवत आणि घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील तिन्ही जागांवर विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ आता पूर्णत: गेल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीतून दिसून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचार महायुतीच्या सरकारला शेतकरी विरोधी ठरविण्याकडे असेल, असे संकेतही विभागीय आढावा बैठकीतून देण्यात आले. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा – लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

चेन्निथल्ला म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. मराठवाडा तर शेतकरी आत्महत्येचा प्रदेश झाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७७ आत्महत्या आहेत. त्याच जिल्ह्याचे नेतृत्व कृषिमंत्री करत आहेत. कापूस, सोयाबीन उत्पादक हैराण आहेत. नुसतीच मोठी आश्वासने दिली जात आहेत. केंद्र सरकारलाही या क्षेत्रात योगदान देता आले नाही. त्यांनी शेतकरी विरोधी केलेले तीन कायदे आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना ते विसरुन गेले आहेत.’ छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार बैठकीत त्यांनी हा आरोप केला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळाचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यांच्यासह खासदार कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा – Himanta Biswa Sarma : भूमी व खत जिहादनंतर आता ‘पूर जिहाद’, आसामच्या मुख्यमंत्र्यांची मुसलमानांवर आगपाखड; गुवाहाटीतील पुरावरून…

काँग्रेस नेत्यांच्या भाषणाबरोबरच मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये साेमवारी उत्साह पहावयास मिळाला. छत्रपती संभाजीनगरमधील जितेंद्र देहाडे, कन्नडमधून इच्छुक नामदेव पवार, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, परतूरमधून कल्याण बोराडे यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देताना उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्याही घोषणा दिल्या. या घोषणांची दखल काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात आवर्जून घेतली. ते म्हणाले, ‘दोन दिवसांपासून मराठवाड्यात काँग्रेसचे नेते बैठका घेत आहेत. लातूर व नांदेडमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह होता. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये वाजणारे ढोल, मिरवणुकांनी येणारे कार्यकर्ते, घोषणाबाजी हे खूप चांगले आहे. दोन दिवसांपूर्वी असे काही सांगितले असते तर आम्हीही लातूरमध्ये ते केले असते.’ असे म्हणत अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे कौतुकही केले आणि त्याच वेळी उमेदवारी मागणाऱ्यांना हळूच चिमटाही काढला. आता जे इच्छुक उमदेवार आहेत त्यांना शुभेच्छा आणि उमेदवारी मिळाल्यावर अभिनंदन करू, असे म्हणत अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील ४६ पैकी किती जागा काँग्रेस लढवेल याचे तीन आकडे कार्यकर्त्यांसमोर ठेवले. ते म्हणाले, ‘मराठवाड्यात ४६ मतदारसंघ आहेत. त्यातील १८, २० किंवा २५ जेवढ्या जागा मिळतील, त्या सर्व जागा निवडून आणण्याचा संकल्प करू’ असे अमित देशमुख म्हणाले.