अकोला : राज्यात लोकसभा निवडणूक लढण्यासाठी एकत्रित असलेल्या महाविकास आघाडीमध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून बिघाडी झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. दुसरीकडे ‘मविआ’तील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट देखील या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी आग्रही असून स्थानिक स्तरावरच राजेश मिश्रा यांना उमेदवारी देखील जाहीर केली. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वीच ‘मविआ’मध्ये अंतर्गत वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

अकोल्यात लोकसभेसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता येत्या २६ एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या तीन दशकांपासून परंपरागत लढतीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसने कडवी झुंज दिली होती. त्यानंतर आता पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली.

Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ambadas Danve on ST Bus Ticket Price Hike
Ambadas Danve : एसटीच्या तिकीट दरात वाढ, ठाकरे गट आक्रमक; अंबादास दानवेंनी दिला ‘हा’ मोठा इशारा
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Pradesh Youth Congress protested in Nagpur deciding to relieve 60 office bearers
संघविरोधी आंदोलन भाग न घेतल्याने वडेड्डीवार, ठाकरे, धवड युवक काँग्रेसमधूम पदमुक्त,संघटनेच्या कामात कसूर केल्याचा ठपका

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद वाढले आहेत. काँग्रेस सातत्याने गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघात पराभूत होत असल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. सोबत शिवसेना ठाकरे गटाने शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना उमेदवारी देखील जाहीर केली. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने साजिद खान पठाण, तर शिवसेना ठाकरे गटाने राजेश मिश्रा यांना उमेदवारी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत स्थानिक स्तरावरच ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील वरिष्ठांकडून अद्याप यावर काही भाष्य करण्यात आलेले नाही. अकोला पश्चिममधील पोटनिवडणुकीवरून काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

अकोल्यात मुस्लीम कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने त्याचा फायदा अकोला, अमरावती या लोकसभा मतदारसंघातही होईल, असे काँग्रेसचे गणित आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणिय आहे.

हेही वाचा – मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

अकोला पश्चिम मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने राजेश मिश्रा यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर केली. त्याचा फायदा काँग्रेसला लोकसभेमध्ये देखील होईल. – आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट.

Story img Loader