Who is Abhimanyu Kohar: खानौरी येथे एका वर्षांहून अधिक काळ चालेल्या शेतकरी आंदोलनाला एक नवीन नेता मिळाला आहे. ३१ वर्षीय अभिमन्यू कोहर हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी राजकारणात आणि नंतर शेतीत उतरला. केंद्र सरकारशी चर्चा करणाऱ्या शेतकरी शिष्टमंडळात अभिमन्यूही सामील असतो. शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांच्या खांद्याला खांदा लावून अभिमन्यू लढत आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर खानौरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी रोज माध्यमांना माहिती देण्यात त्याचा पुढाकार असतो.
२०२०-२१ मध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानंतर ४० सदस्यांची संयुक्त किसान मोर्चा समिती स्थापन करण्यात आली होती. अभिमन्यू या समितीचाही भाग होता. परंतु आता अभिमन्यूला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. २३ पिकांना हमीभाव मिळण्यासाठी सरकारची सहमती आवश्यक असल्याचे ते आंदोलनकारी शेतकऱ्यांना समजावून सांगत असतात.