हर्षद कशाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अलिबाग : राज्यात २ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या घटनेला ७६ वर्ष पूर्ण झाली आहे. या कार्यकाळात पक्षाने अनेक चढ उतार पाहीले. मात्र कठीण परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून रहावे यासाठी काही नेत्यांनी महत्वाची भुमिका बजावली. त्यांच्या कार्याचा लोकसत्ताने घेतलेला हा थोडक्यात आढावा….
भाई दि बा पाटील
रायगड जिल्ह्यातील शेकापच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान, पनवेल उरण मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेचे आमदार, एकदा विधानपरिषदेचे सदस्य, दोन वेळा लोकसभेचे खासदार. सिडको आणि जेएपीटी विरोधात शेतकरी लढ्याचे नेतृत्व समर्थपणे केले. या लाठीचार्ज आणि कारावासही भोगला. प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडविण्यात महत्वाची भुमिका बजावली, महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात त्यांनी 11 महिन्यांचा कारावास भोगला. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे ही त्यांची ओळख होती. शेवटच्या टप्प्यात शेकाप नव्या नेतृत्वाशी वाद झाल्याने त्यांनी पक्ष सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात पक्षाला उतरती कळा लागली.
हेही वाचा… ‘भाई’ तुम्ही कोठे आहात?
भाई एन डी पाटील
शेकाप मुलूख मैदान तोफ अशी भाई एन डी पाटील यांची ओखळ होती. पक्षाचे सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी संभाळली. १९६० साली ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर जवळपास १८ वर्ष त्यांनी विधानपरिषदेत शेकापचे प्रतिनिधीत्व केले.१९८५ साली त्यांनी विधानसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली. कोल्हापूर मधून निवडून आले. शरद पवार यांच्या पुलोद सरकार मध्ये काही काळ त्यांनी मंत्रीपदही संभाळले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना कमालीची आस्था होती. विधीमंडळ आणि रस्त्यावर उतरून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांमा वाचा फोडण्याचे काम केले. जळगाव ते नागपूर अशा शेतकरी दिंडीत ते सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातील महामुंबई सेझ विरोधी लढ्याचे नेतृत्वही त्यांनी समर्थपणे पेललं होते. त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या विरोधामुळेच रिलायन्स कंपनीला हा प्रकल्प रद्द करावा लागला होता.
हेही वाचा… शेकापसमोर अस्तित्वाचा प्रश्न, पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन
भाई गणपतराव देशमुख
शेकापच्या आजवरच्या वाटचालीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि जनाधार असलेले व्यक्तीमत्व अशी गणपतराव देशमख यांची ओळख होती. लोक त्यांना प्रेमाने आबासाहेब म्हणूनही ओळखत होते. तब्बल ५४ वर्ष ते सांगोल्याचे आमदार होते. त्यांचा ११ वेळा आमदार होण्याचा त्यांचा विक्रम आजही कोणी मोडू शकलेले नाही. पण साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांची ओळख होती. शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक लढे दिले. एन डी पाटील यांच्या समवेत तेही पुलोद सरकारच्या काळात राजशिष्टाचार आणि वने, खाणकाम आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री होते. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. अन..शेकापने विधानसभेतील हक्काची जागा गमावली.
हेही वाचा… प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात आरोग्यमंत्र्यांच्या भावाची निवडणूक लढण्याची तयारी सुरू
अँड. दत्ता पाटील
भारदस्त आवाज, कणखर व्यक्तीमत्व आणि कायद्याची उत्तम जाण असलेले अँड दत्ता पाटील यांना शेकापकडून दोन वेळा राज्याचे विरोधीपक्ष नेतेपद भुषविण्याची संधी मिळाली. अलिबाग विधानसभेतून सहा वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९८७-८८ आणि १९८९-९० या कालावधीत दोन वेळा विरोधी पक्षनेते पद संभाळण्याची संधी त्यांना मिळाली. १९९१ आणि १९९६ अशी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र दोन्ही वेळा बॅरीस्टर ए आर अंतुले यांनी त्यांचा पराभव केला. यानंतरच्या काळात जयंत पाटील यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी पक्ष सोडला. याच रागातून त्यांनी २००४ अलिबाग मधून मधुकर ठाकूर यांना मदत करून काँग्रेस उमेदवार निवडून आणले होते. नंतर मात्र त्यांनी सक्रीय राजकारणातून बाजूला होत कोकण एज्यूकेशन सोसायटी आणि वकीली व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले होते.
हेही वाचा… भाजप-राष्ट्रवादीत खांदेपालट, शिवसेनेतही नवे चेहरे; काँग्रेसला मुहूर्त मिळेना
भाई विरेंद्रबाबू देशमुख
विदर्भात शेतकरी कामगार पक्षाची पाळंमुळे रोवण्यात विरेंद्रबाबूंचा मोठा वाटा होता. अत्यंत साधा भोळा माणूस , शिस्तप्रिय विचारवंत, राजकिय मुरबी नेता, न्यायप्रिय करारी व्यक्तिमत्व, नैतिक मुल्यांची जडणघडण करणारा नेता अशी विविध वलय विरेंद्रबाबूंच्या व्यक्तिमत्वात होती. ७० आणि ८० च्या दशकात स्वताचे वेगळे स्थान निर्माण केले होते. राजकीय वाटचालीत त्यांनी कधी चढउतार आलेच नाहीत असे नाही. संघर्ष करावा लागलाच नाही असेही नाही. पण यशाने कधी साथ सोडली नाही, हेही तितकेच खरे होते. निवडणूक कोणतीही लढवली तरी यश हमखास विरेंद्रबाबूंच्या पारडयात पडणार, हे समीकरण जवळपास निश्चित होत. काटोल पालीकेच्या अध्यक्षपदा पासून सुरू झालेला राजकीय प्रवास विधानपरिषदे पर्यत येऊन पोहोचला होता.