सुजित तांबडे

पुणे: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्य केलेल्या राज्यातील ४५ मतदार संघांपैकी एक असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात आतापासूनच विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि या मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ‘जर-तर’ची लढाई सुरू झाली आहे. डॉ. कोल्हे हे भाजपमध्ये येण्याच्या शक्यतेने माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. डॉ, कोल्हे हे भाजपमध्ये आले, तर त्यांचे स्वागत; पण शिरुर मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने मीच उमेदवार असणार, अशी उघड भूमिका आढळराव पाटील यांनी घेतल्याने भाजपच्या ‘मिशन शिरूर’ला व्यत्यय आला आहे.

Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ४५ मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर असे दोन मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. कोल्हे यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आढळराव पाटील हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. आता कोल्हे हे भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरू झाली आहे. डॉ. कोल्हे यांनी ही शक्यता वेळोवेळी फेटाळून लावली आहे. ‘भाजपच्या कोणत्याही नेत्यासोबत बैठक झालेली नाही. विरोधी पक्ष म्हणून राजकारणात संवाद असणे आवश्यक असते’ असे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, डॉ. कोल्हे यांची भाजपशी जवळीक याबाबत या मतदार संघात सतत चर्चा होत असते. आता आढळराव पाटील यांनीही डॉ. कोल्हे हे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत केले आहे. मात्र, त्यांचा भाजपमधील प्रवेश हा अडचणीचा ठरणार असल्याने आतापासून शिरुरचा उमेदवार आपणच असल्याचे जाहीर केले आहे. ही जागा शिवसेनेची असल्याने शिवसेनेचा या जागेवर हक्क असल्याची भूमिका आढळराव पाटील यांनी घेतल्याने भाजपच्या ‘मिशन शिरूर’ला अडथळा आला आहे.

आणखी वाचा-आमदारांच्या बंडखोरीमुळे अनंत गीतेंना शिवसेनेत पुन्हा संधी

या मतदार संघात शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघांबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि पुण्यातील हडपसर हे मतदार संघ आहेत. २००८ मध्ये या मतदार संघाची निर्मिती झाली. त्यानंतर सलग दोनवेळा आढळराव पाटील हे या मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. मागील निवडणुकीत डॉ. कोल्हे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. आता कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने आढळराव पाटील यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून या जागेसाठी आग्रह धरला आहे.

मुख्यमंत्र्यांचे शिरुरकडे लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिरूरकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून शिवसेनेकडून सूचविण्यात येणाऱ्या विकासकामांना डावलण्यात येत होते. त्यामुळे आता माजी खासदार आढळराव पाटील यांनी सुचविलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी स्वत: बैठक घेऊन प्रशासनाला कामे सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत.