नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सलग तिसऱ्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी पुन्हा एकदा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. मागच्यावर्षी बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने २३ जानेवारी रोजी ‘पराक्रम दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली होती. तृणमूल काँग्रेसच्या फॉरवर्ड ब्लॉकने यावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा निवडणुकीसाठी राजकीय वापर करत असल्याचा आरोप केला. पराक्रम दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्यामुळे बॅनर्जी यांनी भाषण न करताच स्टेजवरुन खाली उतरणे पसंत केले होते. सरकारी कार्यक्रमात काहीतरी प्रोटोकॉल पाळला गेला पाहीजे, अशी टीकाही केली. यावेळी पुन्हा एकदा जयंती कार्यक्रमावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत.

यासोबतच मागच्यावर्षी पश्चिम बंगाल राज्य सरकराने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रस्तावित केलेला चित्ररथाला दिल्लीने परवानगी नाकारली. हा चित्ररथ नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचे कार्य विशद करणारा होता. चित्ररथ वगळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीचा विचार करण्यात आला नाही. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते इंडिया गेट येथे नेताजी बोस यांचा २८ फुट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने

यंदा मोहन भागवतही कार्यक्रम घेणार

यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बोस यांच्या जयंतीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांची जाहीर सभा कोलकाता येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील मध्यम वर्गीयांमध्ये भाजपासाठी वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल संपुर्ण बंगालमध्ये एका वेगळ्याची प्रकारची आस्था आहे. या आस्थेचा लाभ पुढील पंचायत निवडणुकीत होतो का? याचीही चाचपणी सुरु आहे. यासाठीच मोहन भागवत यांचा पाच दिवसीय दौरा आखण्यात आला आहे. १८ जानेवारी रोजी भागवत बंगालमध्ये येतील तिथून पुढे २३ जानेवारी म्हणजे जयंतीच्या दिवसापर्यंत ते ठिकठिकाणी जाऊन कार्यक्रमांना हजेरी लावतील.

‘नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणा’; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची भारत सरकारला विनंती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांवर विरोधी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. तृणमूलचे उपाध्यक्ष जयप्रकाश मुजूमदार म्हणाले, “मागच्या वर्षी व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजींच्या जयंतीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्या कार्यक्रमात काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. आम्हाला शंका आहे की, हे कार्यक्रम खरंच नेताजींना अभिवादन करण्यासाठी आहेत का? तसंच मोहन भागवत नेताजींच्या कार्यक्रमांना येत आहेत, हे देखील आश्चर्यजनक आहे. संघ सावरकरांची विचारधारा मानतो, ते नेताजींना मानत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात तर नेताजींनी सावरकर यांची भेट घेण्यास देखील नकार दिला होता.”

अग्रलेख : चुकीचा बरोबर अर्थ!

संघाला नेताजींच्या विचारधारेवर बोलण्याचा अधिकार नाही

दुसरीकडे सीपीएम (मार्क्सवादी) पक्षाच्या सुजन चक्रवर्ती यांनी मात्र भाजपा आणि तृणमूल या दोन्ही पक्षांवर टीका केली. “मोहन भागवत यांनी बंगालमध्ये येऊन कार्यक्रम घ्यावेत, त्यांना पुर्ण स्वातंत्र्य आहे. कारण ममता बॅनर्जी यांच्या आश्रयाखाली संघाचा बंगालमध्ये विस्तार होतोय. मात्र संघ नेताजींचे गुणगाण गातोय, यात आम्हाला शंका येते. संघ हा श्यामाप्रसाद मुखर्जी यांची विचारधारा माननारा आहे. नेताजी हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांच्या विरोधात होते. मग मोहन भागवत यांना नेताजींच्या विचारधारेवर बोलण्याचा अधिकार काय? फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांच्याकडून नेताजींचे गुणगाण केले जात आहे.”, अशी प्रतिक्रिया सुजन चक्रवर्ती यांनी दिली.

“..तर घटनाबाह्य काम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नकळत परवानगी देतंय का?” तारीख पे तारीख वरुन ॲड. असीम सरोदे यांची खंत

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीवरुन २०२०, २०२१ अशा दोन्ही वर्ष बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूलमध्ये हमरीतुमरी झालेली आहे. यावर्षी तर खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांचा पाच दिवसीय दौरा होणार आहे. त्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण तर चांगलेच तापले असून नेताजी सुभाषचंद्र नेमके कुणाचे यावरु रणकंदन माजण्याची शक्यता वाटते.

Story img Loader