नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सलग तिसऱ्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी पुन्हा एकदा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. मागच्यावर्षी बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने २३ जानेवारी रोजी ‘पराक्रम दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली होती. तृणमूल काँग्रेसच्या फॉरवर्ड ब्लॉकने यावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा निवडणुकीसाठी राजकीय वापर करत असल्याचा आरोप केला. पराक्रम दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्यामुळे बॅनर्जी यांनी भाषण न करताच स्टेजवरुन खाली उतरणे पसंत केले होते. सरकारी कार्यक्रमात काहीतरी प्रोटोकॉल पाळला गेला पाहीजे, अशी टीकाही केली. यावेळी पुन्हा एकदा जयंती कार्यक्रमावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा