जयपूर (राजस्थान) : आम्ही एकत्र केवळ दिसत नाही तर आम्ही एकत्र आहोत…. हे विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी जयपूर विमानतळावर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट दोन्हीही होते. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यापूर्वी राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘हम साथ साथ है’चा संदेश दिला आहे.

‘सध्या राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. भाजपमध्ये मोदी विरुद्ध वसुंधरा राजे हा संघर्ष उघडपणे होताना दिसतो. काँग्रेसमध्ये राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याचे जाणवते. राजस्थानमधील सत्ता टिकवायची असेल तर नाइलाजाने का होईना दोघांना एकत्र यावे लागेल’, असा दावा राजस्थानातील अनेक काँग्रेस नेत्यांशी जवळीक असलेल्या एका उद्योजकाने केला.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा… निवडणूक प्रचारासाठी बनविले एआय टूल; तरुणाने स्वतःच निवडणुकीत उतरून केली अनोखी जाहीरात

राहुल गांधींच्या या विधानाला महत्त्व आहे. तुम्ही दोन दिवसांपूर्वी मला भेटला असता तर काँग्रेसचे काही खरे नाही असे मी सांगितले असते. राहुल गांधी जयपूरला आल्यामुळे काँग्रेसमधील वातावरण बदलू शकेल, असे गेहेलोत यांच्या खंद्या समर्थक नेत्याचे म्हणणे होते. जयपूर विमानतळावर राहुल गांधींचे विधान फक्त अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्या मतभेदांपुरते सीमित नाही, असा काही जाणकारांना कयास आहे. ‘मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये काँग्रेस निश्चित जिंकेल, राजस्थानमध्ये अटीतटीची लढाई असल्याचे राहुल गांधींनी एका मुलाखतीत सांगितले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी गेहलोत यांचे खच्चीकरण करणारे विधान कशासाठी केले? राहुल गांधींनी राजस्थानमध्ये प्रचारही केलेला नाही’, असा मुद्दा राजकीय विश्लेषकाने उपस्थित केला.

हेही वाचा… मध्य प्रदेश सरकारने तीन वर्षात फक्त २१ जणांना नोकरी दिली; प्रियांका गांधींचा आरोप प्रचारात का गाजला?

‘आता या शंका-कुशंका उरलेल्या नाहीत. सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा काही दिवस जयपूरमध्ये मुक्काम असेल. शिवाय, महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत, पायलट यांच्याशी चर्चा केली आहे. आता एकमेकांबद्दल अढी राहिलेली नाही’, असा दावा करत काँग्रेसच्या नेत्याने वादाचा आरोप फेटाळला. दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी जयपूरला आल्या आहेत. दिल्लीबाहेर राहण्यामागील कारण प्रकृतीशी निगडीत असले तरी सोनिया गांधींनी जयपूरची निवड करून राजकीय संदेशही दिल्याचे मानले जात आहे. राहुल गांधीही आठवडाभर इथेच असतील. राजस्थानमध्ये आठवड्याभरात ते चार प्रचारसभा घेणार आहेत. गुरुवारी चुरूमध्ये झालेल्या सभेत गेहलोत व पायलटही उपस्थित होते. मध्य प्रदेशमध्ये शुक्रवारी मतदान असल्यामुळे आता काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचेही राजस्थानमध्ये दौरे होणार आहेत.

हेही वाचा… मध्य प्रदेशात कमलनाथांचा बदला की, ‘लाडली बहनां’ची कृपा?

‘राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपद राजपूत-ब्राह्मण या समाजातील नेत्याकडे असले पाहिजे. हे नेते सगळ्या समाजाला सोबत घेऊन जातात असे आम्हाला वाटते. अशोक गेहलोत ओबीसी समाजातून येतात, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी भेदभाव केला नाही. खरेतर वसुंधरा राजेंपेक्षा अशोक गेहलोत अधिक सक्षम आहेत’, असे मत जयपूरचे उपनगर असलेल्या झोटवाडा भागातील भाजपचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. हे कार्यकर्ते झोटवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व झोटवाडा ग्रामीणमधील विद्यमान खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांचा प्रचार करत होते. उच्चवर्णीय असल्याचा अहंकार त्यांच्या या विधानातून डोकावत असला तरी काँग्रेसमधील गेहलोत यांचे महत्त्व त्यातून स्पष्ट होते. वसुंधरा राजेंचे समर्थक आणि विरोधक अशी राजस्थान भाजपमध्ये विभागणी झालेली असून वसुंधरांवर टीका करण्यासाठी विरोधक गेहलोतांचा आधार घेताना दिसतात.

हेही वाचा… असुरक्षित आदिवासी समूहाच्या ७५ जमातींसाठी २४ हजार कोटींची तरतूद; निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण

पुढील गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील प्रचाराची सांगता होईल. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये काँग्रेसचे नेते एकत्र असल्याचे चित्र उभे राहिले तरच भाजपशी दोन हात करता येईल हे ओळखून राहुल, गेहलोत आणि पायलट आता एका व्यासपीठावर दिसू लागले आहेत. पण, गेल्या वेळी गुर्जरांच्या पाठिंब्यामुळे पूर्व राजस्थानमध्ये मिळालेल्या भरघोस यशाची पुनरावृत्ती सचिन पायलट यांना करता येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. ‘२०१८ मध्ये पायलट प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी राज्य पिंजून काढले होते. यावेळी गेहलोतांमुळे त्यांची कोंडी झाली आहे, ते पूर्वी इतके सक्रिय नाहीत’, असा दावा पायलटांच्या सहानुभूतीदाराने केला. ‘काँग्रेसला सत्ता राखता आली तर सगळे श्रेय गेहलोत यांना मिळेल. त्यामुळे काँग्रेस हायकमांडला गेहलोत यांनाच मुख्यमंत्री करावे लागेल. काँग्रेसचा पराभव झाला तर सचिन पायलटांकडे कदाचित विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकेल’, असे गेहलोत समर्थक पदाधिकाऱ्याचे म्हणणे होते.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा असून काँग्रेसला २०१८ मध्ये १०० जागा मिळाल्या होत्या तर, भाजपला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. अपक्ष १३, बसप ६, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष ३, माकप २, भारतीय ट्रायबल पक्ष २, राष्ट्रीय लोकदलाला १ जागा मिळाली होती. गेल्यावेळी काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली होती.

Story img Loader