राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत समाजातल्या विविध स्तरांमधले लोक येऊन सहभागी होत आहेत. ही भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे तेव्हापासूनच अनेक लोक राहुल गांधी यांच्यासोबत या यात्रेत सहभागी होत चालले आहे. बुधवारी ही भारत जोडो यात्रा बागपत या ठिकाणी होती. तिथून ही यात्रा शामलीच्या दिशेने गेली. त्यावेळी या यात्रेत भोजपुरी सिंगर नेहा राठोडही सहभागी झाली होती.
परिवर्तनाविषयी काय म्हणाली नेहा राठोड?
या यात्रेत सहभागी झालेल्या नेहा राठोडने तिचं मत व्यक्त केलं. ती म्हणाली भारत जोडो यात्रा ही सकारात्मक आहे. मी सगळ्या लोकांचे आभार मानते. मात्र हे लक्षात घ्या की ही यात्रा फक्त सत्ता परिवर्तानासाठी आहे का? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. याचं उत्तर हे फक्त आपली जनताच देऊ शकते. मी या यात्रेत सहभागी झाले कारण माझा उद्देश हा होता की मी गाण्यांच्या माध्यमांतून आपलं म्हणणं जनतेपर्यंत पोहचवू शकेन.
राहुल गांधींना पाहण्यासाठी अनेक लोक येतात
राहुल गांधी यांना पाहण्यासाठी अनेक लोक या यात्रेत सहभागी होता. मी मात्र या यात्रेचा हिस्सा नाही. मी फक्त राहुल गांधींना भेटायला आले होते. जनतेचं म्हणणं मी त्यांना सांगायला आले होते.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी काय म्हटलं आहे?
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं की पहिल्यांदाच काँग्रेसने विचारधारांची लढाई लढण्याचं ठरवलं आहे. भारत जोडो या यात्रेतून आम्ही आजच्या घडीला जो नकारात्मक विचार आहे जो पसरवला जातो आहे त्याच्याशी लढतो आहोत. ही लढाई आम्ही काही वर्षांपूर्वीच लढायला हवी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा विभाजनकारी आहे आमचा अजेंडा मात्र देश जोडणारा आहे असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. संघाच्या विभाजनकारी अजेंड्याशी आम्ही देश जोडण्याच्या विचारांनी लढू असंही त्यांनी स्पष्ट केलं.