लक्ष्मण राऊत

जालना : सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी होणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीकडे वानवा आहे. यातूनच सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. १९९६ आणि १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत उत्तमसिंग पवार आणि त्यानंतरच्या सलग पाच निवडणुकांत रावसाहेब दानवे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. १९९९ पासून काँग्रेस उमेदवारांचा पराभव झालेला आहे.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य

रावसाहेब दानवे निवडणुकीच्य राजकारणात वाकबगार मानले जातात. १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. भाजपासोबतच विरोधी पक्षांतील अनेक लहान-मोठ्या नेत्यांशी त्यातही काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गेल्या निवडणुकीपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत होती. या वेळेस शिवसेना (उद्धव ठाकरे) त्यांच्यासोबत असणार नाही. या नवीन राजकीय समीकरणाने भाजप म्हणजेच रावसाहेब दानवे यांची मते किती कमी होतील याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांत आहे. विशेष म्हणजे भाजपमध्येही ही चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा… पुणे काँग्रेसमध्ये सारे काही शांत शांत…

सलग पाच निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशीच झालेली आहे. दानवेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध त्या पक्षात चालू आहे. मागील पाच निवडणुकांत सर्वाधिक चुरशीची लढत दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात झाली होती. त्यावेळी काळे फार कमी फरकाने म्हणजे एक हजार ८३८ मतांनी पराभूत झाले होते. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा आहे. जालना शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमूद यांनी या संदर्भात सांगितले की, गेल्या पाच निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झालेला असला तरी यापैकी अनेक निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. १९९८ आणि २००९ मध्ये काँग्रेस उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले होते. तर १९९९ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता.

हेही वाचा… मंत्र्यांच्या साक्षीवर शिंदे गटाची मदार, अधिवेशन काळातही सुनावणी

आगामी निवडणुकीसाठी कल्याण काळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह अन्य काही नावेही उमेदवारीकरिता चर्चेत आहेत. काँग्रेस पक्ष सलग पराभूत होत असल्याने महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) उमेदवार उभा करावा म्हणजे तो भाजपला समर्थ टक्कर देऊ शकेल असा सूर त्या पक्षातून उमटत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्यासह काही नावे यासाठी कार्यकर्त्यांच्या पातळीवरील चर्चेत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’स सांगितले की, या लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत उमेदवारीसाठी आवश्यक असते. महाविकासा आघाडीत ही जागा सोडवून घ्यावी अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. आमच्या पक्षास जागा सुटली तर उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

हेही वाचा… मावळमध्ये अजितदादा पुत्र पार्थ पवारांसाठी जुळवाजुळव?

१९९९ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे होते. त्या वेळेस या दोन्ही पक्षांचा पराभव करून भाजपचे रावसाहेब दानवे पहिल्यांदाच लोकसभा सदस्य पदावर निवडून आले होते. २०२४च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नावे चर्चेत आली आहेत. आमदार राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात नसून परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. परंतु जालना लोकसभा उमेदवारीचा विषय निघाला की त्यांच्या नावाची चर्चा पक्षात हमखास असते. भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे नावही चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून ते तीन वेळेस आमदारपदी निवडून आले होते. त्यांचे वडील कै. पुंडलिकराव दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. याशिवाय पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे नावही इच्छुक उमेदवारांमध्ये घेतले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमचा पक्ष सज्ज आहे. या मतदारसंघात पक्षाचे मोठे जाळे आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची मागणी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे.

Story img Loader