मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालेगाव (जि. वाशीम) : विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्याच्या हिताचे कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना आपल्या विरोधातील अन्यायासाठी वर्षभर आंदोलन करावे लागले. शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यास केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे. जनतेच्या मागणीचा सरकारने सहानुभुतीने विचार करुन त्याची अंमलबजावणी करायला हवी. काँग्रेस शासित राज्ये राजस्थान व छत्तिसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आले तर तेथेही ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्यास कटीबद्ध आहे, असे सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा… भारत जोडो यात्रा थांबल्यास त्याचे काय परिणाम होतील, याची चिंता करावी – नाना पटोले

देशातील वाढती महागाई हा ज्वलंत मुद्दा असून मागील दहा महिन्यांपासून महागाईचा दर ६ टक्यापेक्षा जास्त आहे पण भाजपा सरकारला महागाई दिसत नाही. देशात महागाई नाही असे मोदी सरकारचे मंत्री सांगत आहेत तर काही जण अमेरिका, इंग्लंडमध्येही महागाई असल्याचे सांगून जबाबदारी झटकत आहेत. अमेरिका आणि इंग्लड येथील दरडोई उत्पन्न व महागाई यांचा व भारतातील परिस्थितीत फरक आहे. भारतात महागाई ही नफेखोरीमुळे वाढली आहे हा यातील फरक आहे.

भाजपशासित राज्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न – जयराम रमेश

भारत जोडो यात्रेमध्ये भाजपाशासित राज्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणातही असे प्रयत्न झाले. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्क अडथळे निर्माण केले जात आहेत असा आरोप काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केला.

हेही वाचा… भास्कर अंबेकर : राजकारणाला सामाजिक कार्याची जोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगा या योजनेची खिल्ली उडवली होती पण आजही तीच योजना रोजगार देण्यास आधार ठरली आहे. अन्न सुरक्षा योजनेलाही नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता आता तीच योजना जनतेला धान्य पुरवण्यास उपयोगी ठरली आहे. मनरेगा ही महाराष्ट्रातील नेते वी. स. पागे यांच्या संकल्पनेतून बनलेल्या रोजगार हमी योजनेवर बेतलेली आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

देशभरात दररोज शेकडो किलोमीटरचे रस्ते बांधतो, अशी वल्गणा करणाऱ्या नितीन गडकरींना विदर्भ, मराठवाड्यातील रस्ते बांधणी करता आले नाहीत. या भागातील रस्ते अत्यंत खराब आहेत, असे जयराम रमेश म्हणाले. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, महिमा सिंह उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the increase in farmer suicides wrong policies of the government are responsible congress spokesperson supriya shrinate criticized print politics news asj